वाशिम | Washim
महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थिती अत्यंत भीषण असून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या अभावामुळे पिकं करपून गेली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसांपासून दुष्काळ दौऱ्यावर आहेत. आज गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी वाशिम जिल्ह्यातील म्हसाळा गावात शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत मोठ्या घोषणा केल्या. कोरड्या दुष्काळासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) उद्याच काढण्यात येईल आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत दिली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. तसेच २०१६-१७ मधील कर्जमाफीच्या प्रक्रियेत लाभापासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा त्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले मुख्यमंत्री
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस गेल्या दोन दिवसांपासून विविध जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. त्यानंतर गुरुवारी ते वाशिम जिल्ह्यातील म्हसळा गावात पोहोचले. यावेळी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर पिकांचे नुकसान, पाण्याची टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मांडला. शेतकऱ्यांनी दिलेली निवेदने स्वीकारून फडणवीस यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि सरकार मदतीसाठी पावले उचलत असल्याचे सांगितले.
कोरड्या दुष्काळाचा जीआर काढणार
“उद्या आपण कोरड्या दुष्काळाचा जीआर काढणार आहोत. सगळ्यांना पूर्णपणे मदत करणार आहोत आणि २०१६-२०१७ मध्ये जे शेतकरी कर्जमाफीतून वंचित राहिले आहेत. त्यांनाही कर्जमाफी आपण देणार आहोत. मी आता सांगितलं आहे की, विम्याचे जे प्रश्न आहेत ते प्रश्नही आपण सोडवणार आहोत. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“सरकारने कर्जमाफी सुरू केलेली आहे. ती पूर्ण केली जाईल. विजेचे बिल माफ केले आहे. पण, आता शेतकऱ्याला थेट मदतीची गरज आहे. त्यामुळे थेट शेतकऱ्याच्या खात्यात मदत करणे असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, चाऱ्याचा प्रश्न असेल, काही ठिकाणी मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होईल, त्यात मदत केली जाईल. अन्नधान्याच्या प्रश्नातही मदत केली जाईल”, अ”अतिशय अडचणीची परिस्थिती आलेली आहे.
कोणत्याही बँकाना वसूली करु देणार नाही
बँकांनाही आम्ही सांगू. कोणत्याही बँकांना वसूली करू देणार नाही. कर्जाच्या वसुलीला पूर्णपणे स्थगिती देऊ. जिथे जिथे पाण्याची उपलब्धता होईल, तिथे रब्बीच्या पिकासाठी शेतकऱ्यांना पूर्ण मदत दिली जाईल. पिक विमा कंपन्यांना आम्ही सरळ करू आणि त्यांच्याकडून पूर्ण पैसा मिळवू”, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिले.शी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.




