Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis : "मी महाराष्ट्राच्या जनतेला..."; गटनेतेपदी निवड होताच फडणवीस नेमकं काय...

Devendra Fadnavis : “मी महाराष्ट्राच्या जनतेला…”; गटनेतेपदी निवड होताच फडणवीस नेमकं काय म्हणाले?

मुंबई | Mumbai

विधानसभा निवडणुकीनंतर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या महायुती सरकारमध्ये (Mahayuti Govertment) मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार याचा पेच अखेर सुटला आहे. आज विधिमंडळात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वानुमते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. त्यामुळे आता राज्याचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर उपस्थित आमदारांना (MLA) देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले.

- Advertisement -

हे देखील वाचा : मोठी बातमी! भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड

यावेळी ते म्हणाले की, “विधिमंडळ गटनेता म्हणून सगळ्यांनी माझी निवड केली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. यावेळची निवडणूक ऐतिहासिक अशी होती. या निवडणुकीचे विश्लेषण करायचे झाले तर या निवडणुकीने आपल्यासमोर एक गोष्ट निश्चित केली आहे. ती म्हणजे एक है, तो सेफ है आणि मोदी है तो मुमकिन है. मोदींच्या नेतृत्वात देशात विजयाची मालिका लोकसभेनंतर पुन्हा एकदा हरियाणापासून सुरू झाली आणि महाराष्ट्राने (Maharashtra) दिलेल्या कौलानंतर जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो. एका कार्यकर्त्याला सर्वोच्च पदावर तीन वेळा मोदींनी या पदावर बसवलं. अर्थात, एकदा ७२ तासांसाठीच होतो. पण तरीही तांत्रिकदृष्ट्या मुख्यमंत्री होतो. त्यामुळे तीन वेळा मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसण्याचा मान मोदींनी दिला. हा पक्ष त्यांच्या नेतृत्वात मोठा झाला. त्यातूनच सामान्य कार्यकर्त्याला वेगवेगळी पदं मिळाली, काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी मोदींचे आभार मानतो. पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचेही आभार मानतो”, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Maharashtra Politics : विधिमंडळात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरु

पुढे बोलतांना फडणवीस म्हणाले की, “मी एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे देखील आभार मानतो. आरपीआयचे नेते रामदास आठवले आणि आमच्या सर्व मित्रपक्षांचेही आभार मानतो. संविधानाची यावेळी ७५ वर्षं पूर्ण होत आहेत. त्यामुळे सर्वार्थाने महत्त्वाचे असे हे वर्षं आहे. मोदी नेहमी सांगतात की कोणत्याही धर्मग्रंथापेक्षा माझ्यासाठी देशाचं संविधन सर्वात महत्त्वाचं आहे. या संविधानाने (Constitution) प्रत्येक भारतीयाला जगण्याचा, मोठं होण्याचा अधिकार दिला आहे. भारताला उत्तम राष्ट्र म्हणून प्रस्थापित करण्याचे काम केले. संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षात पुन्हा सरकार स्थापन करत आहोत”, असेही त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा : Sukhbir Singh Badal: मोठी बातमी! शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न Video

फडणवीस पुढे म्हणाले की, “हिंदुस्थानात मोगली आक्रमणानंतर आपल्या श्रद्धास्थानाचे पुनरुत्थान केले त्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती आहे. बिरसा मुंडा यांचीही १२५ जयंतीचे वर्ष आहे.वाजपेयी यांचे देखील हे १०० वे जयंती वर्ष आहे. या महत्त्वाच्या जयंती वर्षात जनतेने महायुतीवर जबाबदारी दिली आहे. इतका मोठा जनादेश आपल्याला जनतेने दिला आहे. आपल्याला सगळ्यांच्या मनातल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करता येत नाहीत. पण आपण एक मोठं ध्येय घेऊन राजकारणात आलो आहोत. फक्त पदांसाठी आलेलो नाही. त्यामुळे मला पूर्ण अपेक्षा आहे की येत्या काळात काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील, काही गोष्टी मनाविरुद्ध होतील. तरीही आपण सगळे व्यापक हितासाठी एकत्र काम करू आणि आपली शक्ती दाखवून देऊ”, असेही फडणवीस यांनी म्हटले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...