नाशिक | प्रतिनिधी
दीपोत्सवातील महत्त्वाचा दिवस असलेले लक्ष्मीपूजन यंदा रविवारी (दि.८) होत आहे. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने घरांची स्वच्छता, आकर्षक रांगोळी, विद्युत रोषणाई, फराळाची तयारी, तसेच लक्ष्मी-गणेशाच्या पूजेची तयारी करण्यात येत आहे.
व्यापारी वर्गाकडूनही दुकाने व व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये चोपडा पूजनाची तयारी सुरू आहे. नाशिकसाठी पंचांगानुसार लक्ष्मीपूजनाचा मुख्य शुभ मुहूर्त सायंकाळी ६.२२ ते रात्री ८.२२ असा आहे. हा काळ प्रदोष तसेच वृषभ (स्थिर) लग्नाचा असल्याने लक्ष्मीपूजनासाठी विशेष शुभ मानला जातो. प्रदोष काळ सायंकाळी ५.५७ ते रात्री ८.३० पर्यंत आहे.
यंदा अमावस्या तिथी ८ नोव्हेंबरला सकाळी ११.२७ वाजता सुरू होऊन ९ नोव्हेंबरला दुपारी १२.३१ वाजता समाप्त होत असल्याने ८ नोव्हेंबरच्या सायंकाळीच लक्ष्मीपूजन केले जाणार आहे.
Nashik News: स्वीकृत अकराव्या सदस्याचा वाद संपला; सुफी जीन यांचा अर्ज बाद, दहा सदस्यांचे अर्ज वैध
सायंकाळी पूजास्थळी चौरंग मांडून त्यावर लक्ष्मी गणेशाची स्थापना, कलशपूजन, दीपप्रज्वलन, कुबेरपूजन, नैवेद्य व आरती करण्यात येईल. घराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून पूजास्थळापर्यंत लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढण्याचीही परंपरा आहे. व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये नवीन हिशोबाच्या वह्यांचे पूजन करून आर्थिक वर्षासाठी समृद्धीची प्रार्थना केली जाते.
लक्ष्मीपूजन मुहूर्त :
रविवार, ८ नोव्हेंबर २०२६ सायं. ६.२२ ते रात्री ८.३३. पर्यंत.




