Monday, October 5, 2026
Homeदेश विदेशआमच्या अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप करु नका; डोनाल्ड ट्रम्पना 'या' देशाचा गंभीर इशारा

आमच्या अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप करु नका; डोनाल्ड ट्रम्पना ‘या’ देशाचा गंभीर इशारा

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझ सामुद्रधुनीचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर नियंत्रण ठेवण्याचा इशारा दिल्यानंतर परिस्थिती अधिक चिघळली आहे. इस्लामाबादमध्ये तब्बल 21 तास इराण आणि अमेरिकेत चर्चा झाली. पण शेवटी हाती काहीच लागले नाही. उलट इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढल्याचे बघायला मिळाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी १३ एप्रिलपासून होर्मुजच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी जाहीर केली आहे. ट्रम्प यांच्या धमकीला तेहरानने तीव्र प्रत्युत्तर दिले. चीननेही होर्मुजच्या सामुद्रधुनीबाबत एक महत्त्वपूर्ण निवेदन जारी केले आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने तणाव वाढत आहे.

आमच्या अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप करु नये
चीनचे संरक्षण मंत्री ॲडमिरल डोंग जून यांनी होर्मुज खाडीच्या मुद्याबाबत बोलताना म्हटले की, आम्ही जगात शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी कटिबद्ध आहोत. आम्ही मध्य-पूर्वेतील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. जहाजे होर्मुज खाडीतून ये-जा करत आहेत. आमचे आणि इराणचे व्यापार करार आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो आणि इतरांनी आमच्या अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू नये, असे चीनने स्पष्ट शब्दात सांगितले.

- Advertisement -

होर्मुज इराणच्या नियंत्रणाखाली आहे आणि आमचे जहाज तिथून ये-जा करत आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी देखील बोलताना म्हटले की, चीन इराणला शस्त्रपुरवठा करण्याची योजना आखत आहे. त्यासाठी दुहेरी-वापराचे तंत्रज्ञान आणि संबंधित उपकरणे आधीच पुरवली आहेत, हे आरोप निराधार आणि खोटे आहेत.

एक अब्ज डॉलर आणि देशातील एक सुंदर तरुणी लग्नासाठी द्यावी; ‘या’ देशाच्या लष्करप्रमुखाची तुक्रीयेकडे अजब मागणी

इराणकडून भूमिका स्पष्ट
अमेरिकेच्या या भूमिकेनंतर इराणकडूनही तीव्र प्रतिक्रिया आली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार इराणकडे असल्याचे सांगत त्यांनी कोणत्याही दबावाला झुकणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या भागात तणाव आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील महत्त्वाची तेल वाहतूक मार्ग असल्यामुळे येथे निर्माण झालेला तणाव जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकतो. तज्ज्ञांच्या मते, जर परिस्थिती आणखी बिघडली तर तेलाच्या किंमती वाढण्याची आणि ऊर्जा संकट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ताज्या बातम्या

Nashik MC News : महापालिकेच्या पाच विषय समित्यांची निवडणूक जाहीर; बिनविरोधासाठी...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक महापालिकेतील (Nashik Municipal Corporation) पाच प्रमुख विषय समित्यांच्या सभापतीपदांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याबरोबरच ही पाचही पदे बिनविरोध मिळविण्याची...