Friday, June 12, 2026
Homeक्रीडामाजी आशियाई क्रीडा सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांच निधन

माजी आशियाई क्रीडा सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांच निधन

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित प्रख्यात भारतीय नेमबाजी प्रशिक्षक जसपाल राणा यांचे शुक्रवारी निधन झाले. माजी आशियाई क्रीडा सुवर्णपदक विजेते आणि दोन वेळचे ऑलिम्पिक पदक विजेते व स्टार नेमबाज मनू भाकर यांचे प्रशिक्षक असलेले जसपाल राणा यांचे वयाच्या ४९ व्या वर्षी निधन झाले आहे. नेमबाजीतून निवृत्त झाल्यानंतर ते प्रशिक्षक म्हणून काम करत होते. जसपाल राणा यांच्या निधनाच्या वृत्ताने क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ते भारतीय संघाच्या दमदार कामगिरीनंतर म्युनिकहून भारतात परतले होते. म्युनिकहून दिल्लीला प्रवास करत असताना जसपाल यांची प्रकृती बिघडली. दिल्लीला पोहोचल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने थेट विमानतळावरून साकेत इथल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आज (शुक्रवार) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

- Advertisement -

फेब्रुवारी २०२५ मध्ये एनआरएआयने (NRAI) त्यांची २५ मीटर पिस्तूल प्रकारासाठी उच्च-कार्यक्षमता प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने म्युनिक विश्वचषक स्पर्धेत दोन सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांसह चार पदकं जिंकून उत्कृष्ट कामगिरी केली.

Nashik Tapovan: तपोवन वृक्षतोड प्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी

कोण होते जसपाल राणा
जसपाल राणा हे प्रामुख्याने २५ मीटर सेंटर फायर पिस्तूल प्रकारातील तज्ज्ञ मानले जात. अवघ्या १८ व्या वर्षी, म्हणजेच १९९४ च्या हिरोशिमा आशियाई खेळांमध्ये त्यांनी सुवर्णपदक जिंकून खळबळ उडवून दिली होती. २००६ मधील दोहा आशियाई खेळांमध्ये त्यांनी ३ सुवर्णपदके जिंकली आणि ५९० पॉइंट्ससह जागतिक विक्रमाची बरोबरी केली होती. कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासात एकूण 15 पदके (9 सुवर्ण, 4 रौप्य आणि 2 कांस्य) जिंकणारे ते भारताचे सर्वाधिक यशस्वी खेळाडू राहिले आहेत. जसपाल राणा यांनी मार्गदर्शक म्हणून भारतीय नेमबाजीचा चेहरामोहरा बदलून टाकला. जसपाल यांनी सौरभ चौधरी, मनू भाकर, अनिश भानवाला, चिंकी यादव यांसारखे जागतिक दर्जाचे नेमबाज देशाला दिले.

मोदींकडून शोक व्यक्त
जसपाल राणा यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दु:ख व्यक्त केलंय. जसपाल राणा जी यांच्या निधनामुळे अत्यंत दुःख झाले आहे. त्यांचे जाणे ही भारतीय क्रीडा विश्वासाठी एक मोठी हानी आहे. नेमबाजीतील आपल्या असाधारण कामगिरीद्वारे त्यांनी देशाला प्रचंड गौरव मिळवून दिला. एक मार्गदर्शक म्हणूनही त्यांचे योगदान तितकेच उल्लेखनीय होते; त्यांनी अत्यंत निष्ठेने युवा खेळाडूंना घडवले आणि त्यांना मार्गदर्शन केले. उत्कृष्टतेचा ध्यास, शिस्त आणि क्रीडा क्षेत्राप्रती असलेली त्यांची निस्सीम सेवा यामुळे त्यांना प्रचंड आदर मिळाला. दुःखाच्या या कठीण प्रसंगी माझ्या संवेदना त्यांचे कुटुंब, मित्र आणि संपूर्ण क्रीडा विश्वाच्या सोबत आहेत, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

ताज्या बातम्या

देवेंद्र

Devendra Fadnavis: “लाँगेस्ट नव्हे तर फायनेस्ट…”; CM देवेंद्र फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींच...

0
मुंबई | Mumbaiदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळाचा विक्रम मोडीत काढला आहे. पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी...