मुंबई | Mumbai
“विरोधक पंतप्रधान मोदींवर आरोप करत आहेत, पण मोदीजी खरे धुरंधर आहेत, त्यांच्यावर टीका करणारे हे दलिंदर आहेत”, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पलटवार केला. नाशिकच्या चांदवड तालुक्यात आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने हमीभाव मिळावा या मागणीसाठी मोर्चा आयोजित करण्यात आला होता. कांद्याला किमान ३ हजार रुपये हमीभाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. या मोर्चाला विरोधी पक्षातील अनेक नेते उपस्थित होते. यावेळी भाषणात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान मोदींवर खालच्या भाषेत टीका केली होती. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपकाळ यांना प्रत्युत्तर दिले आहे.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
मुंबईत माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांना हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारण्यात आले. ते म्हणाले, “हर्षवर्धन सपकाळ हे जेमतेम एक-दीड वर्षापासून प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. पंतप्रधान मोदी हे १३ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते. १२ वर्षांपासून या देशाचे पंतप्रधान म्हणून काम करत आहेत. त्यांनी देशाला विकासाकडे, आर्थिक महासत्तेकडे नेण्याचे काम केले आहे. आत्मनिर्भर भारत बनवण्याचे काम केले आहे. पंतप्रधानांवर खालच्या दर्जात टीका करणे हे निंदाजनक आहे. मी त्याचा निषेध करतो.”
जेवणात वाढलेली कढी आवडली नाही म्हणून पतीने थेट…घटना वाचून धक्का बसेल; कोणार्क नगरमधील संतापजनक घटना
पंतप्रधान नरेंद्र मोदी धुरंधर आहे
ज्यांच्यावर आरोप केला ते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धुरंधर आहेत. देशाचे धुरंधर आहेत, विकासाचे धुरंधर आहेत. ज्यांनी आरोप केला ते असली दलिंदर आहेत. हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. कुठे राजा भोज आणि कुठे गंगू तेली, म्हणून याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. या देशीतील 140 कोटी जनता काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
चांदवड चौफुली येथे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कांद्याला किमान २४ रुपये हमीभाव मिळावा आणि विकलेल्या कांद्याला १५ रुपये अनुदान देण्यात यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
हर्षवर्धन सपकाळ नेमके काय म्हणाले होते?
काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह भाषा वापरली. “मोदी कांदाXXX आहे. आजपर्यंत नमकXXX ऐकले होते. मोदी म्हणाला कांदा खाल्ला आहे. कांद्याच्या भावाला मोदी, फडणवीस जबाबदार आहेत . फडणवीस विदर्भाचे झाले नाहीत, ते आपले काय होणार? XXXX जोपर्यंत पंतप्रधान पदाच्या खुर्चीत आहे, तोपर्यंत काही होणार नाही. हा भांडकुदळ आजूबाजूच्या देशांशी भांडण करतो”, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.




