Monday, August 17, 2026
Homeक्राईमNashik Crime News: जेवणात वाढलेली कढी आवडली नाही म्हणून पतीने थेट…घटना वाचून...

Nashik Crime News: जेवणात वाढलेली कढी आवडली नाही म्हणून पतीने थेट…घटना वाचून धक्का बसेल; कोणार्क नगरमधील संतापजनक घटना

नाशिक | प्रतिनिधी
आडगाव हद्दीतील कोणार्कनगर येथे कौटुंबिक हिंसेची संतापजनक घटना समोर आली आहे. जेवणात वाढलेली कढी आवडली नाही म्हणून एका पतीने आणि सासूने सुनेला मारहाण करत, तिच्या अंगावर उकळती कढी फेकल्याची घटना घडली आहे. या घटनेत ३४ वर्षीय विवाहिता भाजली असून, तिच्या तक्रारीवरून आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Trambakeshwar News: कडलगचा जामीन अर्ज पुन्हा रखडला; ‘या’ तारखेला होणार पुढील सुनावणी

- Advertisement -

कोणार्क नगर भागातील चौंडेश्वरीनगर परिसरात ही घटना (दि. २१) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. घरात नेहमीनुसार जेवणाची वेळ झाली होती. फिर्यादी सुनीता गौतम कांबळे (३४) यांनी पतीला जेवण वाढून दिले. ताटात कढी वाढलेली पाहून पतीचा पारा चढला. मला कढी आवडली नाही असे म्हणत पतीने क्षुल्लक कारणावरून सुनीताशी वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर, हा वाद इतका टोकाला गेला की, पतीने आणि सासूने संगनमताने सुनीताला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. संतापाच्या भरात ताटात वाढलेली गरम कढी पतीने थेट सुनीताच्या अंगावर फेकून दिली. या गरम कढीमुळे सुनीता यांच्या मानेच्या डाव्या बाजूचा खालचा भाग, पाठ, डावा खांदा आणि दंड गंभीररित्या भाजले आहेत. एवढ्यावरच न थांबता, दोन्ही संशयितांनी तिला बेदम मारहाण केली आणि कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. आडगाव पोलिसात गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार अहिरे करत आहेत.

ताज्या बातम्या

बिहारमधील लखीसराय मंदिरात चेंगराचेंगरी; सात भाविकांचा मृत्यू, 12 भाविक जखमी

0
दिल्ली। Delhi पवित्र श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी बिहारमधील लखीसराय येथील प्रसिद्ध 'अशोक धाम' मंदिरात एक अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. मंदिरात शिवाभूमीत जलाभिषेक...