नवी दिल्ली | New Delhi
देशभरात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रियेवरून (SIR) राजकीय वाद सुरू असतानाच भारतीय निवडणूक आयोगातील प्रशासकीय बदलांची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये पदभार स्वीकारल्यापासूनच्या सुमारे २० महिन्यांत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील १८ ते २० मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) बदलण्यात आल्याचे द इकॉनॉमिक टाइम्सने उपलब्ध आकडेवारीच्या आधारे वृत्त दिले आहे.
एका रिपोर्टनुसार, या काळात मुख्य निवडणूक अधिकारी तसेच निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी विशेषतः उप निवडणूक आयुक्त (डीईसी) यांच्या स्तरावर अनेक महत्त्वाचे बदल झाले. गेल्या काही वर्षांत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्याही झाल्या आहेत परंतु २०२५-२६ चा कालावधी तुलनेने अधिक जास्त बदल्यांचा होता. ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळाच्या पहिल्या २० महिन्यांत सुमारे १८ ते २० मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
नाशिकरोडच्या MSEB कार्यालयाला आग, मोठ्याप्रमाणात साहित्य जळून खाक
किती अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या?
यााधी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि सुशील चंद्र यांच्या कार्यकाळामध्ये जवळपास २९ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. या कालावधीत लोकसभा निवडणुका देखील झाल्या होत्या. अहवालानुसार, लोकसभा निवडणुकांदरम्यान मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. पण २०२५ आणि २०२६ या कालावधील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच राहिले आहे. ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात सर्वात जास्त बदल्या झाल्या आहेत.
फेब्रुवारी 2025 पासून आतापर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळाच्या सुरुवातीला 20 महिन्यात सुमारे 18 ते 20 मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.
मे 2022 ते फेब्रुवारी 2025 : माजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या सुमारे 33 महिन्याच्या कार्यकाळात सुमारे 23 मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. या काळात 2024ची लोकसभा निवडणूकही झाली.
कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच…
निवडणूक आयोगात प्रशासकीय सातत्य ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांना कमीत कमी तीन वर्षापर्यंत एकाच ठिकाणी ठेवले जाते. पण काही आकडे पाहिले तर, सात अधिकाऱ्यांच्या बदल्या तीन वर्षाच्या आत झाल्याचे समोर आले आहे. म्हणजे अवघ्या दोन वर्षाच्या कमी काळातही या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 2025 मध्ये ८ ते ९ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर २०२६ मध्ये आतापर्यंत कमती कमी १० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
बिहारमध्ये मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या बदल्या २०२५ मध्ये सुरू झाल्या. SIR प्रक्रिया राबवणारे हे पहिले राज्य होते. २०२५ अखेरीस SIR च्या दुसऱ्या टप्प्याच्या काही दिवस आधी लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बदली झाली होती.
या प्रशासकीय बदलांमधील लक्षद्वीपचे उदाहरण विशेष लक्षवेधी आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये गौरव सिंह राजावत यांची बदली झाली. त्यानंतर जानेवारी २०२६ मध्ये अवनीश कुमार यांनी जबाबदारी स्वीकारली. मात्र, ते जुलैपर्यंतच पदावर राहिले आणि त्यानंतर ए. एस. शिवकुमार यांची नियुक्ती करण्यात आली. म्हणजेच, नोव्हेंबर २०२५ ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीत लक्षद्वीपमध्ये तीन वेगवेगळे अधिकारी CEO म्हणून कार्यरत होते.



