मुंबई | Mumbai
भोंदूबाबा अशोख खरात याचे रोज नवनवे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषणासोबतच आर्थिक फसवणुकीचे देखील गुन्हे आता समोर येत आहे. याचदरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज अशोक खरात प्रकरणी खळबळजनक आरोप केले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राजकीय नेते आणि अशोक खरातमध्ये फोनवरून किती वेळा आणि कितीवेळ संभाषण झाले, याची एक आकडेवारीच समोर आणली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( अजित पवार ) नेत्या, रूपाली चाकणकर यांनी १७७ , तर त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांनीही २३६ कॉल्स खरातला केल्याचा बॉम्ब दमानियांनी फोडला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 17 कॉल्स अशोक खरातला नॉर्मल मोबाईलवरून झाले. यामध्ये १० इनकमींग, ७ आऊट गोईंग होते. यात साधारण २१ मिनिटे अशोक खरात आणि एकनाथ शिंदे यांच्यात संभाषण झाले, असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला. हे फोन कशासाठी करण्यात आले, याचे उत्तर शिंदेंनी देणं गरजेचं आहे,” असं अंजली दमानियांनी म्हटलं.
बारामती, राहुरीत काँग्रेस उमेदवार उतरवणार; हायकमांडकडून ग्रीन सिग्नल
माझ्याकडे सीडीआरची प्रत
अंजली दमानिया म्हणाल्या, “माझ्याकडे एक सीडीआरची प्रत व्हॉट्सॲप आली आहे. ही माहिती मी मुख्यमंत्री, एसआयटीच्या तेजस्वी सातपुते आणि महाराष्ट्राचे महासंचालक यांना पाठवली आहे. रूपाली चाकणकरांनी १७७ कॉल्स, त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांनी २३६ कॉल्स अशोक खरातला केले आहेत.”
“चंद्रकांत पाटलांनी ८ फोन कॉल्स खरातला केले आहेत. सुनील तटकरे यांनीही ८ फोन कॉल्स खरातला केलेत. तर, आशिष शेलार यांनीही खरातला १ फोन कॉल केला आहे. हे साधे फोन कॉल एवढ्या प्रमाणात करण्यात आले असतील, तर व्हॉट्सॲपचे किती फोन कॉल केले असतील, याची कल्पनाही करवत नाही,” अशी शंका अंजली दमानियांनी उपस्थित केली.
Leopard Attack: पिंपळणारे येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकर्याचा मृत्यू
रुपाली चाकणकरांना अटक होऊन चौकशी झाली पाहिजे
अशोक खरातसोबत सगळ्यात जास्त वेळ कोण बोललं याची माहिती घेतली. यामध्ये तृप्ती खरात पहिले नाव आहे. दुसऱ्या नंबरवर रूपाली चाकणकर आहे. ३३ हजार ७२७ सेकंद रुपाली चाकणकर अशोक खरातशी बोलल्या होत्या. आताच्या घटकेला यांना अटक होऊन पूर्ण चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली. इतका वेळ कुणीही कुठल्याही गुरूंशी बोलत नाही. दिपक लोंढे तिसरे नावं आहे. दिपक लोंढे यांचे 189 कॉल्स झाले होते. 30 हजार 529 सेकंद कॉल्स झाले. कतार, युएस, व्हर्जीन आयलंड, अशा देशातूनही अशोक खरातला फोन आले आहेत.





