Sunday, October 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमाजी प्रदेश महामंत्र्यांना ऑडिओ क्लिप प्रकरण भोवलं! विजय चौधरींची भाजपमधून हकालपट्टी

माजी प्रदेश महामंत्र्यांना ऑडिओ क्लिप प्रकरण भोवलं! विजय चौधरींची भाजपमधून हकालपट्टी

मुंबई | Mumbai
नंदुरबार जिल्ह्यातील अंतर्गत वादाला कथित ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे नवे वळण लागले आहे. भाजपचे माजी प्रदेश महामंत्री आणि उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्या विरोधात पक्षातून हकालपट्टीची मागणीही करण्यात आली होती. नंदुरबारच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह संभाषण असलेल्या ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा वाद उफाळून आला होता. त्यानंतर आता विजय चौधरी यांची भाजप पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली आहे. कथीत ऑडिओ क्लीपमुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असल्याचे म्हंटले जात आहे. या कारवाईमुळे उत्तर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी विजय चौधरी यांची माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याबाबतच्या आक्षेपार्ह ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. कधी शासकीय अधिकारी, कधी पक्षाचे पदाधिकारी, तर कधी थेट मंत्र्यांसोबतच्या संवादाच्या ऑडिओ क्लिप्स समोर आल्याने नंदुरबारमधील राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापले होते. या ऑडिओ क्लिप्समधून चौधरी आणि पक्षाच्या वरिष्ठ मंत्र्यांचे कथित संभाषण समोर आले होते. त्यानंतर विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ऑडिओ क्लीप प्रकरणानंतर पक्षांतर्गत राजकारण चांगलेच चर्चेत आले होते.

- Advertisement -

मोठी बातमी! नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजनांची नियुक्ती; रायगडची धुरा भरत गोगावले यांच्याकडे

या व्हायरल ऑडिओ प्रकारामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याची गंभीर दखल घेत प्रदेश नेतृत्वाने विजय चौधरी यांच्याविरोधात कडक पाऊले उचलत त्यांची पक्षातून थेट हकालपट्टी केली आहे. याबाबतचे अधिकृत पत्रक जारी करत घोषणा केली आहे. तसेच त्यांना पक्षातील सर्व प्राथमिक सदस्यत्वावरुन आणि जबाबदाऱ्यांतून मुक्त करण्यात आले आहे.

नेमकं प्रकरण काय?
विजय चौधरी यांचा मंत्री जयकुमार रावल आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबतचा संवादही व्हायरल झाल्याने भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. एका ऑडिओ क्लिपमधून भाजप नेते विजयकुमार गावित यांच्या कुटुंबीयांनाही लक्ष्य करण्यात आल्याचे समोर आले होते, ज्यामध्ये माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप आहे.

या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून डॉ. हिना गावित यांचे चुलत भाऊ रोहन गावित यांच्याविरोधात पोलिसांनी जातिवाचक शिवीगाळ आणि इतर संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या सर्व प्रकारामुळे डॉ. हिना गावित यांच्या समर्थकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत होता. गावित समर्थकांनी विविध पोलीस ठाणे आणि तहसील कार्यालयात जाऊन दोषींवर कडक कारवाईची मागणी केली होती.

दरम्यान, नंदुरबारमधील स्थानिक वाद वाढल्यास त्याचा आगामी निवडणुकांवर थेट परिणाम होण्याची शक्यता ओळखूनच पक्षाने विजय चौधरी यांच्यावर कठोर कारवाई करून शिस्तभंगाचा स्पष्ट संदेश दिला आहे. एका बाजूला नाराज नेत्यांना शांत करणे आणि दुसऱ्या बाजूला पक्षातील अंतर्गत गटबाजी रोखणे, हे मोठे आव्हान सध्या भाजप प्रदेश नेतृत्वापुढे उभे ठाकले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : नोकरीचे आमिष दाखवून सहा लाखांची फसवणूक; म्हसरूळ...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvti नोकरी (Job) मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची ६ लाख ४५ हजार ५३१ रुपयांची ऑनलाइन फसवणूक (Fraud) करणाऱ्या अट्टल सायबर...