Saturday, April 4, 2026
Homeदेश विदेशमी आजारी असल्याचे कधीही म्हटले नाही, तर…; माजी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचा...

मी आजारी असल्याचे कधीही म्हटले नाही, तर…; माजी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचा राजीनाम्याबाबत मोठा खुलासा

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गेल्या वर्षी जुलै महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या कार्यकाळाची अवघी ३ वर्ष त्यांनी पूर्ण केली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनखड यांनी राजीनामा दिला होता, ज्यामुळे अनेकांना आश्चर्चयाचा धक्का बसला होता. आता त्यांनी त्या संदर्भात मोठे विधान केले आहे. “आपला राजीनामा राजीनामा खराब प्रकृतीमुळे नव्हता, तर ‘प्रकृतीला प्राधान्य’ देण्यासाठी हा निर्णय घेतला होता,” असे खुद्द धनखड यांनीच स्पष्ट केले आहे. ते राजस्थानमध्ये एका सभेत बोलत होते.

धनखड म्हणाले, “असे म्हटले जाते की, पहिले सुख निरोगी काया. मी आरोग्याप्रति नेहमीच जागरुक असतो. पद सोडताना मी आजारी असल्याचे कधीही म्हटले नाही, तर आरोग्याला महत्त्व देत असल्याचे म्हटले होते.” धनखड यांनी २१ जुलै २०२५ रोजी राष्ट्रपतींकडे सुपुर्द केलेल्या आपल्या राजीनाम्यातही “आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्यासाठी” आपण पद सोडत असल्याचे म्हटले होते.

- Advertisement -

धनखड यांनी २१ जुलै २०२५ रोजी राष्ट्रपदी द्रोपदी मूर्मू यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, ते आरोग्याची काळजी घेण्यास प्राधान्य देण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्यांचे पालन करण्यासाठी राजीनामा देत आहेत. अचानक राजीनामा दिल्याच्या मुद्द्यावरून धनखड यांनी बाळगलेल्या मौनाबाबत लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी देखील प्रश्न उपस्थित केले होते.

“हा अपघात धुक्याने झाला की धोक्याने? सरकार संशयाचं भूत नाचवतय”; राज ठाकरेंचा सरकारला सवाल

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धनखड यांच्या राजीनाम्यासंदर्भात प्रश्नांची सरबत्ती केली होती. “त्यांनी राजीनामा का दिला आणि ते गप्प का आहेत, यामागे एक मोठी कथा आहे. राज्यसभेत गरजणारा माणूस अचानक शांत का झाला?” असे प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केले होते.

चुरूचे विद्यमान काँग्रेस खासदार राहुल कसवान आणि ऑलिंपियन तसेच माजी काँग्रेस आमदार कृष्णा पूनिया यांचे वडील माजी काँग्रेस खासदार राम सिंह कसवान यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात जगदीप धनखड सहभागी झाले होते.

माजी उपराष्ट्रपती धनखड म्हणाले की, राम सिंह यांच्या प्रकृतीच्या चिंतेमुळे ते चुरू येथे आले आहेत आणि जेव्हा कधी ते अजारी असतात तेव्हा राम सिंह हे त्यांची चौकशी करणारे पहिले व्यक्ती असतात असेही धनखड यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्या

अंजली

Sanjay Raut: अंजली दमानिया रॉ च्या एजंट आहे का? अशोक खरात...

0
मुंबई | Mumbaiभोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची राज्यात जोरदार चर्चा असून महिलांवर अत्याचर करणाऱ्या खरातकडे राजकारणी, नेते, सेलिब्रिटी हे त्याच्याकडे यायचे अशी माहिती समोर आली....