Tuesday, November 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूजशेतकऱ्यांच्या मदतीसाठी समृद्धी महामार्गावर ठाकरे सेनेचा रास्ता रोको; नितीन देशमुखांच्या नेतृत्वाखाली आंदोलन,...

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी समृद्धी महामार्गावर ठाकरे सेनेचा रास्ता रोको; नितीन देशमुखांच्या नेतृत्वाखाली आंदोलन, पोलिसांचा मोठा बंदोबस्त

वाशिम | Washim
अतिवृष्टी, पिकांचे नुकसान आणि आर्थिक संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पुरेशी आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज समृद्धी महामार्गावर आंदोलनाची हाक दिली आहे. वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा–शेलूबाजार परिसरात आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात ये आहे. शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्यावी, अशी ठाकरे गटाची प्रमुख मागणी आहे. आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

राज्यात दुष्काळाची धग जाणवण्यास सुरुवात झाली असून विर्दभात त्याची दाहकता अधिकच जाणवू लागली आहे. शेतकऱ्यांमधील अंसतोषाला वाचा फोडण्यासाठी ठाकरे गटाने आज समृद्धी महामार्ग रोखण्याचा इशारा दिला होता. मात्र, पोलिसांनी त्या आधीच आंदोलकांना रोखलं.

- Advertisement -

त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्मध्वजारोहणाची जय्यत तयारी; धर्मध्वजावरील शुभचिन्हे ठरणार आकर्षण

हेक्टरी एक लाखांची मदत द्या; ठाकरे गटाची मागणी
पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि पिकांच्या नुकसानीचा मोठा फटका बसल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. अशा परिस्थितीत सरकारने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची तातडीची अग्रिम मदत अपुरी असल्याची भूमिका पक्षाने मांडली आहे. प्रभावित शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, पीकविम्याची रक्कम तातडीने द्यावी, शेतमालाला योग्य भाव मिळावा आणि बँकांकडून होणारी सक्तीची कर्जवसुली थांबवावी, अशा मागण्या आंदोलनातून करण्यात आल्या आहे.

आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान सुमारे १५०० पोलीस कर्मचारी आणि १५० पोलीस अधिकाऱ्यांचा कडक पहारा लावण्यात आला होता. मात्र, संतप्त शेतकरी आणि आंदोलनकर्ते समृद्धी महामार्गावर ठाण मांडण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : थोरात, काळे, मुळा, ज्ञानेश्वर, अशोक आणि अगस्तीसह ढाकणेंकडून पहिली...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील 18 साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला असून, आतापर्यंत सुमारे 30 लाख 20 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप...