Saturday, November 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजगोकुळ ही कोणाची जहागीर नाही! कोल्हापूर अहंकाराची मस्ती उतरवतं; अध्यादेशानंतर सतेज पाटलांची...

गोकुळ ही कोणाची जहागीर नाही! कोल्हापूर अहंकाराची मस्ती उतरवतं; अध्यादेशानंतर सतेज पाटलांची सरकारवर टीका

कोल्हापूर | Kolhapur
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ला डोळ्यासमोर ठेवून सहकार कायद्यात दुरुस्ती करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील अध्यादेशावर त्यांनी आज (06 नोव्हेंबर) स्वाक्षरी केली. त्यामुळे गोकुळवर शासन नामनिर्देशित 5 संचालक नेमण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावरुन आता समविचारी आघाडीचे नेते आणि आमदार सतेज पाटील आक्रमक झाले आहे. अध्यादेश निघाल्यानंतर त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत राज्यातील ज्या सहकारी संस्थांची वार्षिक उलाढाल 500 कोटींहून अधिक आहे, अशा संस्थांच्या समित्यांवर नामनिर्देशित पाच सदस्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या पाच पैकी चार संचालकांना मतदानाचा अधिकारसुद्धा बहाल करण्यात आला आहे. गोकुळची सत्ता ताब्यात घेण्याच्या हेतूने सरकारने घेतलेल्या या निर्णयावर चौफेर टीका होत असताना सरकारने आपला निर्णय पुढे रेटला होता.

- Advertisement -

राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर सुधारणा अध्यादेश काढण्याचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवण्यात आला होता. तर दुसरीकडे अध्यक्ष निवडीसाठी येत्या 10 नोव्हेंबरला बैठक होणार असून तत्पूर्वी न्यायालयातून या अध्यादेशाला स्थगिती मिळवण्याचा सतेज पाटील यांचा प्रयत्न आहे. याशिवाय त्यांनी येत्या 9 नोव्हेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाविरोधात कोल्हापुरात महामोर्चाची हाक दिली होती. अशातच राज्यपालांकडून अध्यादेशावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. त्यामुळे सतेज पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाले सतेज पाटील?
आमदार सतेज पाटील यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. “तुम्ही कोल्हापूरकरांचा विश्वास जिंकून दाखवू शकला नाही, मग अध्यादेशाच्या आडून गोकुळमध्ये आपली माणसं घुसवून सभासदांचा कौल कशाला तुडवता? गोकुळ ही तुमची जहागीर नाही,” असा थेट इशारा सतेज पाटील यांनी दिला आहे. सरकारच्या या हस्तक्षेपाविरोधात येत्या सोमवार, ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता ऐतिहासिक दसरा चौकातून ‘संघर्ष मोर्चा’ काढण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

तुम्ही कोल्हापूरकरांचा विश्वास जिंकून दाखवू शकला नाही ! मग अध्यादेशाच्या आडून गोकुळमध्ये आपली माणसं घुसवून सभासदांचा कौल कशाला तुडवता ?

चार नियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देणं म्हणजे सभासदांच्या कौलावर सरकारी दरोडा आणि कोल्हापूरकरांच्या स्वाभिमानाचा अपमान !

घाम आमच्या दूध उत्पादकांचा, संस्था आमच्या सभासदांची आणि हुकूम तुमचा? गोकुळ तुमची जहागीर नाही!

लक्षात ठेवा, कोल्हापूर स्वाभिमानाशी तडजोड करत नाही; अहंकाराची मस्ती उतरवतं. फक्त वेळ येण्याची वाट पाहतं !

आता यायला लागतंय!
कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा..
9 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता,दसरा चौक..— Satej (Bunty) D. Patil (@satejp) November 6, 2026

सभासदांच्या कौलावर टाकलेला सरकारी दरोडा
सतेज पाटील यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत महायुती सरकारवर टीका केली. “तुम्ही कोल्हापूरकरांचा विश्वास जिंकून दाखवू शकला नाही. मग अध्यादेशाच्या आडून गोकुळमध्ये आपली माणसं घुसवून सभासदांचा कौल कशाला तुडवता? चार नियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देणं म्हणजे सभासदांच्या कौलावर टाकलेला सरकारी दरोडा आणि कोल्हापूरकरांच्या स्वाभिमानाचा थेट अपमान आहे”.

संपादकीय : ७ नोव्हेंबर २०२६ – कुटुंबाचा आकार नव्हे, कर्तृत्व हीच पात्रता

कोल्हापूर कधीही स्वाभिमानाशी तडजोड करत नाही
“घाम आमच्या दूध उत्पादकांचा, संस्था आमच्या सभासदांची आणि हुकूम तुमचा? गोकुळ ही कोणाची जहागीर नाही! एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा कोल्हापूर कधीही स्वाभिमानाशी तडजोड करत नाही, अहंकाराची मस्ती उतरवतं, फक्त वेळ येण्याची वाट पाहतं आहे. त्यामुळे आता आता यायला लागतंय. 9 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता दसरा चौकात कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा, असे म्हणत सतेज पाटील मोर्चाची वेळ सांगितली आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : सुरक्षेचे रक्षक की गुन्हेगारीचे भागीदार? अंतर्गत अनागोंदी,...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik संवेदनशील आणि हाय-प्रोफाईल गुन्हेगारांचा भरणा असलेले नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह (Nashik Road Central Jail) सध्या गुन्हेगारी प्रवृत्तींचे सुधारगृह राहण्याऐवजी नियमबाह्य कृत्यांचा गड...