इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri
मानवाच्या शरीराला व आरोग्याच्या दृष्टीने महाराष्ट्रात गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि मानवी आरोग्यास हानिकारक खाद्यपदार्थांची विक्री करणे, उत्पादन, साठवणुक करणे, वाहतुक करणे आदी व्यवसायांना प्रतिबंधीत करण्यात आलेले आहे. पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुटख्याची वाहतूक, विक्री, वितरण व साठवणूक करणाऱ्यांविरूध्द कारवाई सुरू आहे.
कुर्ल्यानंतर पुन्हा बेस्ट बसचा अपघात; बसखाली आल्यामुळे पादचाऱ्याचा मृत्यू
यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून २४ तास गस्त सुरू असतांना इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीत समृद्धी महामार्गावरील टोलनाक्याच्या जवळ असलेल्या पुलाखाली गुटखा वाहतुक करीत असलेला ट्रक ताब्यात घेण्यात आला. या मालवाहू ट्रकमध्ये गुटख्याची अवैधरित्या वाहतुक करून विक्री करण्याचे उद्देशाने मुंबईकडे जाणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांना मिळाली होती.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
या बातमीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने संबधीत वाहनावर छापा टाकून ट्रक क्रमांक RJ 11 JC 0091 ताब्यात घेतला आहे. ट्रकची छडती घेतली असता महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला, टाटा ट्रक आणि मोबाईल असा एकूण १ कोटी ५३ लाख ५४ हजार रुपये किमतीचा मुद्धेमाल आढळून आल्याने सदर ट्रक जप्त करण्यात आला आहे. ट्रक चालक अरमान शोहराब खान, वय २० रा. नुहू हरियाणा या आरोपीविरुद्ध इगतपुरी पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीसांकडून सुरु असुन हा गुटखा कुठुन घेतला व कोणाला वितरीत करण्यात येणार होता या विषयीचा तपास सुरू आहे.