Wednesday, September 2, 2026
Homeदेश विदेशAmit Shah: मी चर्चेसाठी तयार पण विरोधक...; अधिवेशन संपायला एक दिवस असताना...

Amit Shah: मी चर्चेसाठी तयार पण विरोधक…; अधिवेशन संपायला एक दिवस असताना अमित शाह म्हणाले, मी रोज संसदेत…

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहे..लोकसभेत (Loksabha) यावर चर्चा करून सरकारने उत्तर द्यावे अशी मागणी विरोधकांनी केली होती. पण चर्चेऐवजी सभागृहात विरोधकांकडून गोंधळ घातला जात आहे. यामुळे सभागृहाचे कामकाज सुरळीतपण पार पडत नाहीये. या अधिवेशनात लोकसभेचे कामकाज अजिबातच चालले नाही आणि याला प्रामुख्याने कारण म्हणजे विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या (Amit Shah) अनुपस्थिती. मोदी आणि शहांनी सभागृहात यावे, विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या मारहाणीचे उत्तर द्यावे, अशी मागणी वारंवार विरोधकांनी केली. मात्र, हे दोन्ही नेते सभागृहात अनुपस्थित राहिल्याने विरोधकांनी कामकाज सुरू होताच गोंधळ घातला आणि त्यामुळे सभागृहाचे कामकाज लोकसभा अध्यक्षांनी तहकूब केले. मात्र, आज बुधवारी (12 ऑगस्ट) पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे प्रसार माध्यमांसमोर आले आणि त्यांनी अधिवेशन संपायला एक दिवस शिल्लक असताना मी चर्चेसाठी आणि घडलेल्या घटनेवर निवेदन देण्यास तयार असल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

पावसाळी अधिवशेनादरम्यान अमित शहा पहिल्यांदाच माध्यमांसोर आले. त्यांनी सांगितले की, ‘विरोधकांनी सभागृहाचे कामकाज चालवू द्यावे. आम्ही विद्यार्थी आंदोलनावर चर्चा करण्यासाठी तयार आहोत. फक्त संसदेचे कामकाज चालू द्या. विरोधकांच्या सर्व प्रश्नांची मी उत्तरे देईन. आज दुपारी ३ वाजता चर्चा सुरू करा, उद्या दुपारी ३ वाजता मी निवेदन देईन. मी त्यांचे सर्व पॉइंटर्स लिहून घेऊन आणि त्यांना उत्तर देईन.’

घाटकोपरमध्ये मध्यरात्री चाळीवर दरड कोसळली; आत्तापर्यंत ६ जणांचा मृत्यू, शोधकार्य सुरु

अमित शहा यांनी विरोधकांना आवाहन केले की, ‘सरकार सर्व बाबींवर चर्चा करण्यास तयार आहे. विरोधकांनी संसदेचे कामकाज चालू द्यावे. विरोधकांनी चर्चेसाठी दुपारी २ वाजेपर्यंत अध्यक्षांना पत्र सादर करावे. विरोधी पक्ष संसदेच्या कामकाजात अडथळा आणत आहे. विरोधकांनी ठरवावे की चर्चा करायची की गोंधळ घालायचा. उद्या प्रशोन्नतराचा तासही रद्द करण्याची आमची तयारी आहे.’

तसंच, ‘अधिवेशन सुरू झाल्यापासून आपण नियमितपणे संसदेत उपस्थित राहत असल्याचे अमित शाह यांनी स्पष्ट केले. ‘नीट पेपरफुटीवरून झालेल्या विद्यार्थी आंदोलनासंदर्भात सरकारकडे लपवण्यासारखे काहीही नाही आणि कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास सरकार तयार आहे,’ असे अमित शाह यांनी स्पष्टपणे सांगितले.

तर, अमित शहा यांनी चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी अमित शाह यांच्यावर टीका करताना सांगितले की, ‘गृहमंत्री फक्त लेक्चर देतात. २० दिवसांपासून अमित शाह गायब होते. फुगा फुटला आहे. लाठीचार्जचे आदेश कुणी दिले? हे देशाला जाणून घ्यायचे आहे. ‘,

ताज्या बातम्या

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे उद्या नाशिक दौऱ्यावर

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे गुरुवारी दि.३) नाशिक दौऱ्यावर येत असून, आदिवासी बांधवांच्या विविध प्रश्नांसाठी सुरू...