छत्रपती संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagar
वाळूज परिसरातील खवड्या डोंगरावर घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. १८ वर्षीय कुणाल चांदवडे याने डोंगरावरून टोकाचे पाऊल उचलल्यानंतर त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याचे आई-वडीलही दरीत कोसळले. या घटनेत कुणालसह त्याचे वडील मुरलीधर चांदवडे आणि आई संगीता चांदवडे यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर कुणालने आयफोनसाठी हट्ट केला होता आणि मोबाईलच्या हप्त्यांवरून वडिलांसोबत झालेल्या वादातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले, अशी चर्चा सोशल मीडिया आणि विविध माध्यमांमध्ये सुरू झाली होती. मात्र, आता पोलिसांनी या चर्चांबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे.
‘आयफोन हेच कारण असल्याचे सध्या म्हणता येणार नाही’
छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना स्पष्ट केले की, प्राथमिक तपासात आयफोन किंवा मोबाईल हा कुणालच्या टोकाच्या निर्णयामागील थेट कारण असल्याचे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे केवळ आयफोनच्या मुद्द्यावरून ही घटना घडली, असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या माहितीनुसार, घटनास्थळी कुणालची आई त्याच्याशी सातत्याने संवाद साधत होती. ‘तू कोणत्याही अडचणीत असशील तर आपण ती अडचण सोडवू’, अशा आशयाने ती त्याला समजावत होती. या संवादावरून कुणाल काहीतरी गंभीर मानसिक किंवा कौटुंबिक तणावातून जात असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
तीन तास सुरू होते समजावण्याचे प्रयत्न
पोलिसांनी सध्या तरी आयफोनमुळेच कुणालने आत्महत्येचा प्रयत्न केला, असे निश्चितपणे म्हणता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. घटनेला अजून २४ तास पूर्ण झालेले नसल्याने प्राथमिक तपासाच्या आधारावर आत्महत्येमागचे नेमके कारण सांगणे योग्य ठरणार नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे.
आई-वडिलांसमोरच काळीज पिळवटून टाकणारा प्रसंग
घटनेनंतर कुणाल आणि त्याच्या वडिलांमध्ये वाद झाला होता, तसेच आयफोनसाठीचा हट्ट किंवा त्याच्या ईएमआयमुळे कुणाल तणावात होता, अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र, पोलिसांनी या चर्चांबाबत सावध भूमिका घेतली आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी सांगितले की, या घटनेला अजून 24 तासही पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे केवळ प्राथमिक तपासावरून आयफोनमुळेच त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला, असे खात्रीने सांगता येणार नाही.
पोलिसांच्या माहितीनुसार, कुणाल काही कारणांमुळे तणावात असल्याचं दिसून येत होतं. मात्र, त्याच्या तणावामागचं नेमकं कारण काय होतं, याचा तपास सुरू आहे.
गेल्या वर्षीही कुणालने असे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याची माहिती
दरम्यान, पोलिस सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, कुणाल यापूर्वीही याच डोंगरावर जीवन संपवण्याच्या उद्देशाने आला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यावेळी पोलिसांनी त्याची समजूत काढून त्याला सुरक्षितपणे खाली आणले होते. मात्र, यावेळी परिस्थिती अत्यंत दुर्दैवी वळणावर गेली.




