Monday, June 8, 2026
Homeक्रीडाIndVsAfg Test: अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताचा १ डाव ३०० धावांनी दणदणीत विजय,...

IndVsAfg Test: अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताचा १ डाव ३०० धावांनी दणदणीत विजय, मानव सुथारची ऐतिहासिक कामगिरी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
न्यू चंदीगड येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सुरु असलेल्या भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी सामना खेळवला गेला. यामध्ये भारतीय संघाने सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व कायम ठेवले होते. या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानवर एक डाव आणि ३०० धावांनी विजय मिळवला.

कसोटी क्रिकेटमधील भारतीय संघाचा हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा विजय समजला जातो. याआधी २०१८ मध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडिज विरुद्ध एक डाव आणि २७६ धावांनी विजय मिळवला होता. आता टीम इंडियाने अफगाणिस्तान विरुद्ध कसोटीतील सर्वात मोठ्या विजयासह नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

- Advertisement -

तिसऱ्या दिवशीच संपला खेळ
टीम इंडियाने हा सामना तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात संपवला. दमदार फलंदाजीनंतर फिरकीपटूंनी केलेल्या कमालीच्या कामगिरीच्या जोरावर शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने तिसऱ्या दिवशीच कसोटी सामना संपवला.

भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा हा ऐतिहासिक विजय ठरला आहे. भारतीय संघाने पहिला डाव ८ विकेट गमावून ५६४ वर घोषित केला होता. त्यानंतर अफगाणिस्तानचा पहिला डाव १५२ धावांवर सर्वबाद झाला. यावेळी भारताकडे ४१२ धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे टीम इंडियाने फलंदाजी करण्यापेक्षा फॉलोऑनचा निर्णय घेतला होता. यानंतर, अफगानिस्तानचा संघ 112 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे, भारतीय संघाने हा सामना एक डाव आणि ३०० धावांनी जिंकला आहे.

एकमेव कसोटी सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाकडून कर्णधार शुभमन गिल १२६ (१७७) आणि उप कर्णधार के एल राहुल १०० (१६५) यांच्या शतकी खेळीशिवाय साई सुदर्शन ८१ (१०४), रिषभ पंत ८१ (१२१) आणि वॉशिंग्टन सुंदरच्या ५२ (६८) अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या डावात ८ बाद ५६४ धावांवर पहिला डाव घोषित केला होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना दोन वेळा फलंदाजी करूनही अफगाणिस्तानचा संघ ३०० धावांनी कमी पडला.

मध्य पूर्वेतील तणाव पुन्हा वाढला; भारतीयांना दुतावासाच्या कडक सुचना, कोणत्याही मार्गाचा…

मानव सुथारची ऐतिहासिक कामगिरी
पहिल्या डावात अफगाणिस्तान संघाची सुरुवात खराब झाली. खेळाच्या दुसऱ्या दिवशी अफगाणिस्तानने पाच विकेट्स गमावल्या. फिरकी गोलंदाज मानव सुथारने अब्दुल मलिक (१६ धावा), रहमानुल्ला गुरबाज (१७ धावा) आणि अफसर झाझाई (३ धावा) यांची विकेट घेतली. हा सुथारचा डेब्यूचा सामना होता. दरम्यान, वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने सेदिकुल्ला अटल (१७ धावा) आणि कर्णधार हशमतुल्ला शाहिदी (२० धावा) यांना बाद केले. रहमत शाहने उत्तम फलंदाजी करून अफगाण डाव सावरण्याचा प्रयत्न केला. यावेळी पदार्पण करणाऱ्या मानव सुथारने ६ विकेट्स घेत इतिहास रचला असून त्याला प्लेअर ऑफ द मॅचने सन्मानित करण्यात आले. तर प्रसिद्ध क्रृष्णाने ३ विकेट्स घेतल्या.

ताज्या बातम्या

Rahata : भविष्यातील वाहतुकीचे नियोजन करूनच महामार्गांचे आराखडे तयार करा

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata भविष्यातील वाहतुकीचे नियोजन विचारात घेऊन सर्व राष्ट्रीय महामार्गांच्या (National Highways) कामाचे नियोजन करावे. सार्वजनिक बांधकाम विभाग (Public Works Department) आणि राष्ट्रीय महामार्ग...