Wednesday, April 22, 2026
Homeमुख्य बातम्याPM Narendra Modi: भारत दहशतवादासमोर कधीही झुकणार नाही; पहलगाम हल्ल्याच्या वर्षपूर्तीवर PM...

PM Narendra Modi: भारत दहशतवादासमोर कधीही झुकणार नाही; पहलगाम हल्ल्याच्या वर्षपूर्तीवर PM नरेंद्र मोदींचा संदेश

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्यमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच भारत कोणत्याही स्वरूपाच्या दहशतवादासमोर कधीही झुकणार नाही, असा सज्जड इशारा नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर एक पोस्ट करत देशाच्या शत्रूंना स्पष्ट शब्दांत संदेश दिला आहे.

कोणत्याही स्वरूपाच्या दहशतवादासमोर कधीही झुकणार नाही
नरेंद्र मोदी यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना म्हटले की, गेल्यावर्षी याच दिवशी पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात नाहक बळी ठरलेल्या निष्पाप जीवांचे आज स्मरण आपण करत आहोत. त्यांना कधीही विसरले जाणार नाही. या दुःखाचा सामना करत असलेल्या शोकाकुल कुटुंबांच्या दुःखातही मी सहभागी आहे. तसेच एक राष्ट्र म्हणून संपूर्ण देश या कठीण प्रसंगी शोकाकुल कुटुंबाच्या पाठीशी उभा आहे. भारत कोणत्याही स्वरूपाच्या दहशतवादासमोर कधीही झुकणार नाही. दहशतवाद्यांचे रचलेले कट कधीही यशस्वी होणार नाहीत.

- Advertisement -

कोणत्याही शत्रुत्वपूर्ण कृत्याला निश्चित आणि कडक प्रत्युत्तर दिले जाईल
भारतीय लष्करानेही आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून एक निवेदन जारी केले. त्यात लष्कराने ठामपणे सांगितले की, भारताच्या विरोधात केल्या जाणाऱ्या कोणत्याही शत्रुत्वपूर्ण कृत्याला निश्चित आणि कडक प्रत्युत्तर दिले जाईल. न्याय नेहमीच केला जाईल आणि या आघाडीवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. तसेच ‘ऑपरेशन महादेव’ या मोहिमेअंतर्गत लष्कराने हे मोठे यश संपादन केले आहे. या मोहिमेबाबत लष्कराने संकेत दिले होते की, त्याचे यश ही केवळ काळाची बाब होती.

संपादकीय : २२ एप्रिल २०२६ – लोकशाहीचा उत्सव की यंत्रणांचा संघर्ष?

‘ऑपरेशन सिंदूर’ अद्यापही सुरूच आहे
या मोहिमेदरम्यान, सुमारे 300 चौरस किलोमीटरच्या अत्यंत दुर्गम आणि धोकादायक भूभागात व्यापक व सखोल शोधमोहीम राबवण्यात आली होती. सलग 93 दिवस-रात्र चाललेल्या शोधमोहिमेनंतर सुरक्षा दलांना एक महत्त्वपूर्ण यश मिळाले होते. या मोहिमेत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले, ज्यामुळे या भागात कार्यरत असलेल्या दहशतवादी कारवायांना गटांना मोठा धक्का बसला. तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्यापही सुरूच आहे आणि दहशतवादाविरुद्धची ही मोहीम आगामी काळातही पूर्ण जोमाने सुरू राहील, असेही लष्कराने स्पष्ट केले.

पहलगाम दहशतवादी हल्ला
22 एप्रिल 2025 रोजी दुपारी साधारण 2.30 वाजता जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या ‘बैसारन व्हॅली’मध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. या हल्ल्यात 26 लोकांचा मृत्यू झाला होता. प्राप्त माहितीनुसार, दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराचा गणवेश परिधान केला होता. या हल्ल्यातून सुखरूप बचावलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, दहशतवाद्यांनी सर्वप्रथम पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला आणि त्यांची ओळखपत्रे तपासली. त्यानंतर ते हिंदू असल्याचे निष्पन्न होताच दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळ्या घालून ठार केले होते. या हल्ल्यातील 26 मृतांपैकी बहुतांश लोक पर्यटक होते.

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “मला वाटतं 850 जागांचा आकडा खरात बाबाने दिलाय,...

0
मुंबई । Mumbai मुंबई : केंद्र सरकारने महिला आरक्षण, मतदारसंघ पुनर्रचना आणि केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती हे तीन विधेयक संसदेच्या विशेष अधिवेशनात आणले होते. मात्र...