Wednesday, June 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSharad Pawar: वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी...

Sharad Pawar: वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी करतात – शरद पवार

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी झाल्याचे प्रतिपादन राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित स्मरणिकेत शरद पवार यांच्याकडून याबाबत भाष्य करण्यात आले आहे. वारकी संप्रदायाता ६० टक्के लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणार आहे, असेही शरद पवार यांनी म्हटले. दुर्दैवाने या प्रबोधनाच्या मार्गावर कुठे महिला नाहीत, असल्याची खंतही शरद पवार यांनी व्यक्त केली.

महिला अधिकाऱ्यांचे पहिले अखिल भारतीय साहित्य संमेलन आज ( ११ एप्रिल ) शनिवारी दिल्लीत पार पडत आहे. आज संध्याकाळी या संम्मेलनाचे उद्धाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार आहे.

- Advertisement -

मोठी बातमी! मराठवाडा हादरला; हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यात भूकंपाचे धक्के

या साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत केंद्रीय मंत्री असताना महिलांसाठी वेगळे धोरण आखण्याची गरज तुम्हाला का भासली, यावरही शरद पवार यांनी भाष्य केले आहे. माझ्यावर काही व्यक्तींचा अत्यंत प्रभाव आहे. त्यातील एक म्हणजे माझी आई. त्याकाळी जिल्हा लोक बोर्डात महिला प्रतिनिधीसाठी एक जागा असायची. त्या जागेवरुन संपूर्ण जिल्ह्यातून माझी आई निवडून आली होती. तिचे वैशिष्ट्य म्हणजे ती एकही बैठक चुकवायची नाही. अभ्यास करुन जायची. त्याकाळी प्रवासाची साधने नसायची. खासगी मोटर सर्व्हिस होती, एसटी नसायची, असे शरद पवार यांनी म्हटले.

वारकरी संप्रदायाद प्रतिगामी लोक घुसखोरी करु लागले
वारकरी संप्रदायाबद्दलही शरद पवारांनी रोखठोक भाष्य केले आहे. “वारकरी संप्रदायासारथ्या समतेच्या चळवळीतही प्रतिगामी लोक घुसखोरी करू लागले आहेत. वारकरी संप्रदायात ६० टक्के लोक हे बोलताना धर्मांध शक्तींना अधिक बळ मिळेल, अशा पद्धतीने मांडणी करतात. त्यामुळे आता आम्ही यादी करायला सुरूवात केली आहे. आता साधारण चाळीसएक लोक असे दिसतात की ते वारकी संप्रदायात कीर्तन प्रवचन यामधून पुरोगामी भूमिका मांडताना दिसतात. त्यांची अत्यंत गरज आहे. दुर्दैवाने या प्रबोधनाच्या मार्गावर कुठे महिला दिसत नाही,” अशी खंत शरद पवारांनी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या

Nashik Trimbakeshwar Crime News : त्र्यंबकेश्वरमध्ये चार हॉटेल्सवर गुन्हे; ग्राहकांच्या नोंदी...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Nashik Rural Police) सुरक्षेचा मोर्चा हॉटेल आणि लॉजिंग व्यावसायिकांकडे वळवला आहे. पोलिस अधीक्षक डॉ....