Friday, October 16, 2026
Homeदेश विदेशजंतर-मंतरवर प्रवेश करताच CJP नेते पुन्हा ताब्यात; सौरव दास, आशुतोष रांका यांच्यासह...

जंतर-मंतरवर प्रवेश करताच CJP नेते पुन्हा ताब्यात; सौरव दास, आशुतोष रांका यांच्यासह तिघांवर दिल्ली पोलिसांची कारवाई!

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करण्यावर निर्बंध असतानाही त्या ठिकाणी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) मुख्य प्रवक्ते सौरव दास, राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका आणि पक्षाचे सदस्य अजिंक्य शिंदे यांना दिल्ली पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले आहे. मंगळवारी सकाळी घडलेल्या या कारवाईची माहिती CJPचे संस्थापक अभिजित दिपके यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करून दिली. यापूर्वी १० ऑक्टोबर रोजी या पक्षाच्या नेत्यांना दिल्ली विमानतळावर विमानातूनच ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर सुटका झाल्यानंतर पुन्हा कारवाई झाल्याने दिल्लीतील आंदोलनाचा मुद्दा तापला आहे.

नेमकं काय घडलं?
आशुतोष रांका आणि सीजेपीने पोलिसांच्या या कारवाईचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात सीजेपीचे नेते जंतरमंतरला पोहोचलेले दिसत आहेत. रांका यांचे अनेक समर्थक झेंडे घेऊन ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या घोषणा देताना दिसत आहे. त्यानंतर पोलीस या तरुणांची धरपकड करून व्हॅनमध्ये नेताना दिसत आहेत. दरम्यान, सरकारने आंदोलनाच्या यादीतून जंतरमंतरची जागा हटवली आहे. त्यावर सीजेपीने नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
दरम्यान, अभिजीत दीपके यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. नरेंद्र मोदी हे घाबरले आहेत. त्यामुळेच त्यांनी आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतरमंतरचं नाव हटवलं आहे. त्यांना वाटतंय की आता जंतरमंतर आंदोलनाचं स्थळ राहणार नाही. इथे आंदोलने होणं बंद होतील. पण तसं होणार नाही, असं अभिजीत दीपके यांनी म्हटलं आहे.

Cockroaches with the Tiranga sneaked into Jantar Mantar early this morning before they were picked up by Delhi Police.

@AshutoshRanka, @SauravDassss, @AjinkyaCJP along with other team members have been detained.

You cannot denotify the resistance, @narendramodi https://t.co/x7B40akCVO— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) October 13, 2026

सौरव दास नेमकं काय म्हणाले?
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर CJP नेते सौरव दास यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “आम्ही जंतर-मंतरमध्ये प्रवेश केला आहे आणि आता आम्हाला हिरासत घेतले जात आहे! पण हा आपल्या सर्व तरुण पिढीसाठी एक संदेश आहे, आपण हे करू शकतो!” दरम्यान, प्रशासनाच्या या निर्णयावर आक्रमक भूमिका घेत कार्यकर्त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, सरकार कायदेशीर मार्गाने लोकांचा रोष आणि निषेध नोंदवण्याचा अधिकार अशा प्रकारे प्रतिबंधित करू शकत नाही. सध्या या संपूर्ण प्रकरणावरून दिल्लीच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

राहुल गांधींच्या याचिकेत १४ त्रुटी; सह्यांपासून कागदपत्रांपर्यंत त्रुटी, कोर्ट फीही ₹२२० कमी! सर्वोच्च न्यायालयात सुनावणी लांबणीवर?

जंतरमंतरवर जाण्यास बंदी
सुरक्षेच्या कारणास्तव आणि जंतर-मंतर हा परिसर संसदेसह अत्यंत उच्च सुरक्षा क्षेत्राच्या जवळ असल्याने केंद्र सरकारने १२ ऑक्टोबर रोजी एका अधिसूचनेद्वारे जंतर-मंतरला प्रदर्शन स्थळ म्हणून प्रतिबंधित केले आहे. या परिसरात भारतीय न्याय संहितेची (BNS) कलम १६३ लागू करण्यात आली असून कोणत्याही प्रकारच्या आंदोलनावर कडक बंदी घालण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

MPSC : एमपीएससी अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोलेंकडे

0
मुंबई / प्रतिनिधी Mumbai महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार आयोगाचे सदस्य सतीश वाघोले यांच्याकडे देण्याचा निर्णय राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी घेतला आहे....