Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजलाडक्या बहीणींना सरकारचं नव वर्षाचं गिफ्ट; बँक खात्यात १५०० जमा व्हायला सुरवात,...

लाडक्या बहीणींना सरकारचं नव वर्षाचं गिफ्ट; बँक खात्यात १५०० जमा व्हायला सुरवात, तुम्हाला मिळाले का?

मुंबई | Mumbai
लाडकी बहीणींसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने लाडक्या बहीणींना नविन वर्षाच गिफ्ट दिले आहे. लाडकीच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना नोव्हेंबरचा हप्ता जमा होण्यास उशिर झाला आहे. त्यानंतर आता नोव्हेंबरचा हप्ता जमा करण्यात आला आहे. काल (बुधवारी, ता ३१) सायंकाळी राज्यातल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ता जमा झाला आहे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता बाकी होता. दोन्ही महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतील, असे सांगितले जात होते. तर जानेवारी महिन्याचा देखील हफ्ता एकत्र मिळेल अशी अपेक्षा होती. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे ४ हजार ५०० रुपये जमा होतील, असा अंदाज बांधला होता, मात्र पात्र महिलांच्या बॅंक खात्यात १५०० रूपयांचा एक हफ्ता जमा झाला आहे.

- Advertisement -

Pune News: शिंदे गटाच्या उमेदवाराचा अजब कारनामा; आपल्याच पक्षातील प्रतिस्पर्धी उमेदवाराचा एबी फॉर्म गिळला

YouTube video player

ज्या महिलांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली त्यांच्याच खात्यात १५०० रुपये जमा झाले आहेत. अजूनही काही महिलांच्या खात्यात पैसे येणे बाकी आहे. दरम्यान, आज काही महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. मात्र हे एकाच महिन्याचे पैसे असून डिसेंबरचे आणि आज सुरू झालेल्या जानेवारी महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना कधी मिळतील हे काही स्पष्ट झालेलं नाही. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही ऑनलाइन तपासू शकता.

पैसे आले आहे कसे तपासाल?
लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात. तुम्ही बँकेच्या अधिकृत अॅपवर जाऊन बॅलेन्स चेक करु शकतात. त्यावरुन तुम्हाला समजेल पैसे जमा झाले की नाही. याचसोबत ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्येदेखील तुम्हाला १५०० रुपयांचा मेसेज दिसेल. याचसोबत तुम्ही ऑफलाइन पद्धतीनेदेखील पैसे आले की नाही चेक करु शकतात. तुम्हाला बँकेच्या शाखेत जाऊन पैसे जमा झाले की नाही हे चेक करायचे आहे. याचसोबत तुम्ही पासबुकवर एन्ट्री करु शकतात.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्ह्यात एक लाखांहून अधिक लाडक्या बहिणींची अडचण?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रियेने नगर जिल्ह्यातही महिलांची डोकेदुखी वाढवली. त्यातच जानेवारी महिन्यात अनेक पात्र...