Sunday, May 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! विमानसेवा बंदचा मोठा फटका; सौदीत उमरासाठी गेलेले ५० हजार यात्रेकरू...

मोठी बातमी! विमानसेवा बंदचा मोठा फटका; सौदीत उमरासाठी गेलेले ५० हजार यात्रेकरू अडकले

मुंबई | Mumbai
इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाला आहे. या युद्धामुळे सौदी अरेबियातील विमान वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. भारतातील अनेक लोक दुबईत अडकले आहेत. राज्यातील विविध शहरातील नागरिकांना विमान वाहतूक बंद असल्याने त्यांना भारतात परतणे शक्य नाही. त्यातच आणखी एक माहिती समोर आली आहे. रमजान काळात उमरा या धार्मिक विधीसाठी महाराष्ट्रातून सौदी अरेबियात गेलेले ५० हजार ते १ लाख मुस्लीम बांधव अडकले असल्याची भीती राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी व्यक्त केली.

राज्य अल्पसंख्यांक आयोगाने यासंदर्भात तातडीने हालचाली सुरू करत सर्वांना सुरक्षित परत आणण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. यंदा राज्यातील सुमारे ५०० टूर ऑपरेटर्सनी उमरा या धार्मिक विधीसाठी यात्रेकरूंना पाठवले असून, त्यापैकी केवळ मुंबईतूनच १००हून अधिक ऑपरेटर्स सक्रिय होते, अशी माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

Taliban Attack Pakistan: तालिबानचा पाकिस्तानवर मोठा एअर स्ट्राईक, नूर खान एअर बेससह तळांवर हल्ले

राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी याबाबत माहिती दिली असून, ते म्हणाले, उमरा यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून लोक गेले आहेत. जवळपास ४५ ते ५० हजारांच्या वर आकडा जाऊ शकतो. दुसरीकडे शिख बांधवही तिथे अडकले. जैन, ख्रिश्चन समाजातील लोकही तिथे फसले आहेत. आम्ही सर्व माहिती गोळा करत आहोत. जे लोक सौदी अरेबियात अडकले आहेत त्यांनी जवळच्या दूतावास कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन केले जात आहे.

हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंची नोंद सरकारकडे अधिकृतपणे होते, मात्र उमरासाठी जाणाऱ्यांची कोणतीही केंद्रीकृत नोंदणी नसते. बहुतांश यात्रेकरू खासगी टूर अँड ट्रॅव्हल्स ऑपरेटर्सच्या माध्यमातून प्रवास करतात. त्यामुळे नेमका आकडा सांगणे कठीण होत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.

थोर विचारवंत, माजी खासदार डॉ. जनार्दन माधवराव वाघमारे यांच निधन; ९१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियात अडकलेल्या महाराष्ट्रातील मुस्लीम बांधवांची संख्या स्पष्ट करण्यासाठी सर्व टूर ऑपरेटर्सशी संपर्क साधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सोमवारपर्यंत नेमकी संख्या स्पष्ट होईल, असे प्यारे खान यांनी सांगितले.

तसेच आम्ही सर्व ट्रॅव्हल एजन्सीला पत्र काढले आहे. सौदीत अडकलेल्या भारतीयांना कुठलाही त्रास देऊ नका. सरकार याकडे लक्ष ठेवून आहे. जवळच्या दूतावास कार्यालयात जाऊन लोकांनी आपली समस्या सांगावी असं लोकांना सांगितले जात आहे. परराष्ट्र खाते समन्वय साधत आहे. सोबतच महाराष्ट्र सरकारनेही तिथे अडकलेल्या नागरिकांसाठी एक हेल्पलाईन आणि वेबसाईट जारी केली आहे. ज्या कुणाला अडचणी असतील त्यांनी संपर्क साधावा. सरकार या लोकांची मदत करेल. सध्या सौदी अरेबिया नो फ्लाईट झोनमध्ये आहे. जसे तिथे फ्लाईट सुरू होतील तसे सरकार रेस्क्यू करत विमान पाठवून लोकांना इथं आणले जाईल असंही प्यारे खान यांनी सांगितले.

यासंदर्भात आयोग राज्य सरकारच्या संपर्कात असून, सर्वांना सुरक्षित परत आणण्यासाठी आवश्यक ती मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही संपर्क साधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक गाव, शहर आणि जिल्ह्यातून उमरासाठी मुस्लीम बांधव जात असतात. त्यामुळे ही बाब राज्यभरातील हजारो कुटुंबांशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ताज्या बातम्या

Delhi AC Blast : दिल्लीत अग्नितांडव; एसी नऊ जणांच्या जिवावर बेतला!

0
नवी दिल्ली | New Delhi सध्या देशभरात उष्णतेने (Heat) कहर केला आहे. दिवसांदिवस तापमान वाढत असल्याने या उकाड्यापासुन बचाव करण्यासाठी अनेक घरांमध्ये पंखा किंवा एसी...