Thursday, March 13, 2025
Homeमहाराष्ट्रJitendra Awhad : राष्ट्रवादीच्या नेत्यांचा जितेंद्र आव्हाडांच्या 'त्या' वक्तव्यावर जोरदार पलटवार

Jitendra Awhad : राष्ट्रवादीच्या नेत्यांचा जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ वक्तव्यावर जोरदार पलटवार

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad) यांनी शनिवारी (२ नोव्हेंबर) मुंब्रा-कळव्यात एका जाहीर सभेला संबोधित करताना अजित पवारांचा गट ही पाकिटमारांची टोळी असल्याचे म्हटले होते. तसेच हिंमत असेल तर त्यांनी स्वतःचा वेगळा पक्ष काढून, नव्या निवडणूक चिन्हासह त्यांनी निवडणुकीला सामोरे जायला हवे होते असेही आव्हाड म्हणाले होते. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे यांनी आव्हाडांवर पलटवार करत जोरदार हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : “…तर तुमचा बाबा सिद्दिकी करू”; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

अमोत मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले की, खालच्या भाषेत बोलण्याची जितेंद्र आव्हाडाची संस्कृती आहे. ‘विंचवाची नांगी तैसें दुर्जन सर्वांगी’, या अभंगाlतील ओळीप्रमाणे हा (जितेंद्र आव्हाड) दुर्जन व्यक्ती आहे. त्याच्या नसानसांमध्ये विष भरलं आहे. अजित पवारांच्या वडिलांबद्दल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल (अजित पवार) आव्हाडाने ज्या पद्धतीने टीका केली आहे, ते पाहता मला वाटतं की त्यालाही त्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे. शरद पवारांनाही खरंच वाटत असेल की जितेंद्र आव्हाडांनी अनंत पवारांचा अपमान केला आहे तर त्यांनी जितेंद्र आव्हाडला बारामतीला बोलावून घ्यावं आणि पायातलं पायतान काढून त्याचं थोबाड रंगवावं. अन्यथा मुंब्रा-कळव्यात जाऊन आम्ही आव्हाडला त्याची औकात दाखवणार, असे त्यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा : Jitendra Awhad : “… ही पाकीटमारांची टोळी”; जितेंद्र आव्हाडांचा राष्ट्रवादीवर निशाणा

तर रुपाली ठोंबरे (Rupali Thombare) म्हणाल्या की, जितेंद्र आव्हाड यांनी नुकतंच आम्हाला आणि आमच्या नेत्याला पाकीटमार म्हटलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की त्यांनी मर्द वैगरे असे काही शब्द काढले आहेत. तर मला वाटतं जितेंद्रभाऊ तुमच्या मेंदूला काय लकवा मारलाय का? आपण काय शब्दांचा उपयोग करत आहात.निवडणुकीच्या काळात मान्य आहे की तुमच्याकडे विकासाची कोणतीही कामे सांगायला नाहीत. म्हणून सातत्याने जे स्वत: महापाकीटमार आहेत. होय, जितेंद्र आव्हाड तुम्ही महापाकीटमार, चोर आहात. कारण, ज्यांना कावीळ झालेली असते, त्यांना सगळं जग पिवळं दिसतं. त्यामुळे सातत्याने ज्यांसोबत ज्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम केलं, त्यांनी महायुतीला (Mahayuti) पाठिंबा दिला म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी असे शब्द वापरणार असाल, तर खरंच तुमच्या मेंदूवर लकवा मारलेला आहे, असे त्यांनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...