Wednesday, February 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Assembly Speaker : विधानसभा अध्यक्षपदासाठी फडणवीसांच्या विश्वासूने भरला अर्ज

Maharashtra Assembly Speaker : विधानसभा अध्यक्षपदासाठी फडणवीसांच्या विश्वासूने भरला अर्ज

मुंबई | Mumbai

राज्यातील २८८ विधानसभा आमदारांचा (MLA) शपथविधी पार पडल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळावे या संदर्भातला प्रस्ताव समोर ठेवला असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी महायुतीकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Chandrashekhar Bawankule : “शरद पवारांनी या वयात खोटारडेपणा करू नये”; बावनकुळेंची जहरी टीका

महायुतीकडून पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदासाठी ॲड. राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना संधी देण्यात आली आहे. मागील महायुती सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात राहुल नार्वेकर यांच्याकडे जबाबदारी होती. राहुल नार्वेकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजले जातात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत राहुल नार्वेकर यांनी आपला विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूकीचा अर्ज दाखल केला.पुरेसे संख्याबळ नसल्याने विधानसभा अध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडी अर्ज भरणार नाही. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे दिसून येत आहे.

हे देखील वाचा : Nashik Bus Accident : ई-बस महामार्ग बसस्थानकात घुसली; एका महिलेचा मृत्यू

दरम्यान, त्यानंतर आता महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी ०९ डिसेंबर रोजी निवडणूक (Election) पार पडणार आहे. तसेच महाविकास आघाडीतील नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. ही भेट विधानसभेच्या उपाध्यक्षपदाच्या मागणीसाठी असल्याची चर्चा आहे. एक परंपरा म्हणून विधानसभा उपाध्यक्षपद हे विरोधी पक्षांकडे दिले जाते. मात्र, मागील काही सरकारच्या कार्यकाळापासून यात खंड पडला आहे. आता, महायुती सरकार (Mahayuti Govertment) विरोधकांची मागणी मान्य करतील का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या