Wednesday, July 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRajya Sabha Election: राज्यसभेच्या जागेसाठी मविआत रस्सीखेच; दिल्लीतून उध्दव ठाकरेंना फोन, काँग्रेसने...

Rajya Sabha Election: राज्यसभेच्या जागेसाठी मविआत रस्सीखेच; दिल्लीतून उध्दव ठाकरेंना फोन, काँग्रेसने समोर ठेवला नवा प्रस्ताव

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील ७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून १६ मार्च रोजी मतदान घेण्यात येत आहे. त्यामुळे, सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून महाविकास आघाडीच्या पारड्यात केवळ एकच जागा येत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून ही जागा काँग्रेसला देण्याची विनंती केली आहे. त्याबदल्यात विधान परिषदेची रिक्त होणारी जागा उद्धव ठाकरे यांना देण्याचा प्रस्ताव काँग्रेसकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शरद पवार यांनी राज्यसभेची निवडणूक लढवावी अशी मविआत इच्छा असली तरी, यामुळे काँग्रेसचे राज्यसभेतील ‘विरोधी पक्षनेते पद’ धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतही संजय राऊत यांच्या भूमिकेवरून अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे.

- Advertisement -

PM Narendra Modi: सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर, संकटातून बाहेर पडण्यासाठी चर्चेशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही – पंतप्रधान मोदी

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा करून ही जागा काँग्रेसला सोडण्याची विनंती केली असून, त्याबदल्यात विधान परिषदेची रिक्त होणारी जागा स्वतः उद्धव ठाकरेंना देण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर इंडिया अलायन्स तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडी टिकवण्यासाठी मदत होईल, असा काँग्रेसचा आग्रह आहे. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते पद आपल्याकडे ठेवण्यासाठी काँग्रेसला महाराष्ट्रातील एका जागेची आवश्यकता आहे.

या घडामोडींवर शरद पवार यांच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी १६ मार्चला निवडणूक होणार आहे. आमदारांच्या संख्याबळानुसार महायुतीला ६ जागा आणि महाविकास आघाडीला १ जागा मिळणार आहे. या एका जागेवरून महाविकास आघाडीमध्ये वाद सुरू आहे. तिन्ही पक्षांमध्ये या जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे सध्या राज्यसभेत विरोधी पक्षनेते आहेत. हे पद टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेसला दोन जागा निवडून आणणे अनिवार्य आहे. तेलंगणातून एक जागा निश्चित असली तरी महाराष्ट्रातील दुसरी जागा मिळवणे काँग्रेससाठी अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे. जर ही जागा शरद पवारांना दिली आणि त्यांनी भविष्यात राजकीय भूमिका बदलली, तर काँग्रेसच्या हातून हे महत्त्वाचे पद जाऊ शकते. म्हणूनच, ही जागा पृथ्वीराज चव्हाण किंवा बाळासाहेब थोरात यांच्यासाठी राखली जावी, असा काँग्रेस नेत्यांचा आग्रह आहे. काँग्रेसने आपली अडचण ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवली असल्याची चर्चा आहे.

मोठी बातमी! विमानसेवा बंदचा मोठा फटका; सौदीत उमरासाठी गेलेले ५० हजार यात्रेकरू अडकले

राज्यसभेचे गणित काय आहे?
राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपद कायम राखण्यासाठी त्या पक्षाकडे एकूण सदस्यसंख्येच्या किमान 10% जागा (म्हणजेच 25 सदस्य) असणे बंधनकारक आहे. सध्या काँग्रेसकडे २७ सदस्य आहेत. मात्र, यावर्षी होणाऱ्या ७२ जागांच्या निवडणुकीनंतर हे संख्याबळ २५ च्या खाली जाण्याची भीती काँग्रेसला वाटत आहे. विशेषतः जूनमध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांचा कार्यकाळ संपत असून, त्यांचे पद वाचवण्यासाठी काँग्रेसला प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. याशिवाय महाराष्ट्रातून रजनी पाटील यांचा कार्यकाळ संपत असल्याने, ती जागा पुन्हा जिंकणे काँग्रेससाठी प्रतिष्ठेचे आणि तांत्रिकदृष्ट्या गरजेचे बनले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Rain Update : नाशिकच्या दक्षिण भागात ‘या’ तारखेला मुसळधार पावसाचा...

0
नाशिक | Nashik भारतीय हवामान विभागाने (IMD) शुक्रवार ३१ जुलै रोजी नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाचा (Hevay Rain) इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य...