Friday, September 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूजState Cabinet Meeting: राज्यातील रस्त्यांच्या जाळ्यांचा कायापालट होणार; मंत्रिमंडळ बैठकीत ३ मोठे...

State Cabinet Meeting: राज्यातील रस्त्यांच्या जाळ्यांचा कायापालट होणार; मंत्रिमंडळ बैठकीत ३ मोठे निर्णय

मुंबई | Mumbai
आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अत्यंत मोठे आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. शेतकरी कर्जमाफीला मान्यता देण्यात आली आहे. पण त्यासोबतच ३ महत्त्वाचे अन् धडाकेबाज निर्णय घेण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आंतरराष्ट्रीय बँकेकडून कोट्यवधींच्या कर्ज प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील रस्त्यांच्या जाळ्याचा कायापालट करण्यासाठी दोन मोठ्या बँकांकडून तब्बल १७,४०० कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मिळणार आहे. दुसरीकडे, मुंबईतील शिक्षण क्षेत्रात मोठा बदल करत हैद्राबाद नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठात ६ नामांकित महाविद्यालयांचा समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णयही सरकारने घेतला आहे.

- Advertisement -

मंत्रिमंडळात घेण्यात आलेले निर्णय
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-३ मधील कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या ५०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स कर्जास तसेच राज्य निधीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आलेली आहे.

तसेच, रस्त्यांच्या सुधारणेसाठी आशियाई पायाभूत गुंतवणूक बँके व न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून अर्थसहाय मिळालेले असून महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाला दोन्ही बँकाकडून प्रत्येकी ८ हजार ७०० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे. या अर्थसहाय्याामुळे राज्यातील रस्ते सुधारणा व विकासाला आणखी गती मिळणार आहे.

Farmer Loan Waiver: मोठी बातमी! राज्यातील शेतकरी कर्जमाफी योजनेस मंजूरी; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

हैद्राबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठ, मुंबई या समूह विद्यापीठामध्ये सहा महाविद्यालयांचा समावेश करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता. यामध्ये प्राचार्य के. एम. कुंदनानी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, मुंबई. किशनचंद चेलाराम विधि महाविद्यालय, मुंबई. श्रीमती मिठीबाई मोतीराम कुंदनानी वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, मुंबई. ऋषी दयाराम आणि सेठ हसराम नॅशनल आणि सेठ वासियामुल्ल असोमुल्ल विज्ञान महाविद्यालय, मुंबई व थडोमल शाहनी अभियांत्रिकी महाविद्यालय, मुंबई यांचा घटक महाविद्यालये म्हणून समावेश होणार.

ताज्या बातम्या

संपादकीय : ११ सप्टेंबर २०२६ – विद्यार्थ्यांचा आक्रोश कोणी ऐकेल काय?

0
महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुणे शहरासह संपूर्ण राज्यामध्ये आज स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीमुळे एक अभूतपूर्व आणि चिंताजनक जनक्षोभ उसळला आहे. नीट परीक्षेपासून सुरू...