
जालना | Jalana
मराठा समाजाला पूर्णपणे न्याय मिळावा, मराठा समाजाच्या उर्वरित मागण्या मान्य व्हाव्यात याकरिता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा एल्गार केला आहे. आज शनिवारपासून (ता. 30 मे) मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, नेहमी सावलीत तंबू ठोकून उपोषणाला बसणारे मनोज जरांगे पाटील यंदाच्या वेळी भरउन्हात उपोषणाला बसले आहेत. अंतरवालीतील शेतात भरउन्हात जरांगेंनी उपोषणाला सुरुवात केली आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं आणि त्यांनी उन्हात बसू नये म्हणून स्वत: राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे उपोषण स्थळी आले आहेत. जरांगे यांनी उपोषण सोडावं म्हणून त्यांनी ड्राफ्ट करून आणला आहे. हा ड्राफ्ट त्यांनी मनोज जरांगे यांना दाखवला आहे.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांना ड्राफ्ट दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे समाधानी झाल्याचे दिसले. त्यातील काही मुद्द्यांना त्यांनी मान्यता दिली आहे. तर काही मुद्द्यांवर अभ्यासकांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असं त्यांनी म्हटलं आहे. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राज्याच्या कानाकोपऱ्यातून अभ्यासक येतील. त्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून पुढची भूमिका ठरवू, असं मनोज जरांगे म्हणाले.
सरकारने तयार केलेल्या या ड्राफ्टमध्ये मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर आश्वासने देण्यात आलेली आहेत. त्यातील मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
- कुणबी प्रमाणपत्रांबाबत राज्य सरकारवतीने अधिकृत सूचना देणार आहे. प्रत्येक अधिकाऱ्यांना सूचना दिली जाणार आहे
-58 लाख नोंदी सापडल्या कुणबीप्रमाणपत्र द्या. दिले असेल तर व्हॅलिडिटी देणार आहे. ज्या अधिकाऱ्याने प्रमाणपत्र दिलं नाही, त्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश काढणार आहेत.
-जात पडताळणीचा आढावा प्रत्येक 15 दिवसाने घेणार आहे.
-स्वतंत्र मराठा मंत्रालय एक महिना मागितला. मुख्यमंत्र्यांनी एका दिवसात निर्णय घ्यावा
-बलिदान दिलेल्यांना 15 दिवसात पैसे देणार.
-कुणबी प्रमाणपत्राच्या वाटपाबाबतचा आढावा दर 8 दिवसाने घेणार, जिल्हाधिकारी कार्यालयाला हेल्पलाईन देऊ. हे मान्य - ग्रामस्तरीय कामकाजाचा आढावा 15 दिवसात घेणार आहे. त्याच्याही सूचना काढणार आहेत. त्याही काढतो म्हणाले.
-अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे पैसेही देतो म्हणाले. त्याच्याही सूचना काढणार आहे.
या मागण्यांवर अभ्यासकांसोबत होणार चर्चा
-हैद्राबाद संस्थानच्या गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने एसओपी तयार केली आहे. एसओपी योग्य आहे का? हे अभ्यासकांना विचारून सांगणार आहे.
- -सातारा संस्थानचा गॅझेटियरचा जीआर एक महिन्यात काढू म्हणाले. आम्ही म्हणाले एक दिवसात काढा. ते काढणार आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांशी आणि कायदे तज्ज्ञांशी बोलणार आहेत. ते करतो म्हणाले.
- -सारथीच्या योजना पुन्हा सुरू करणार आहे. पत्रक काढणार आहे. विखे पाटील यांनी तुम्ही ओके म्हणून सांगा. मी पत्रक काढतो असं आश्वासन दिलं. त्यावर, मला याबाबत अभ्यासकांशी बोलावे लागेल. हे योग्य आहे का विचारावं लागेल, असं जरांगे म्हणाले. याबाबत सरकारला शासन आणि प्रशासन स्तरावर सूचना काढाव्या लागतील.




