Sunday, August 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजManoj Jarange Patil: "आमच्या मुलांच्या नरडीचा घोट घेणार असाल तर..."; कुणबी प्रमाणपत्र...

Manoj Jarange Patil: “आमच्या मुलांच्या नरडीचा घोट घेणार असाल तर…”; कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याने मनोज जरांगेंचा आक्रमक पवित्रा

छ. संभाजीनगर | Chhatrapati SambhajiNagar
मराठवाड्यात कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवलेल्या चार मराठा महिला लोकप्रतिनिधींची जात वैधता जात पडताळणी समितीने रद्द केल्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. 15 लाख रुपयांसाठी हे प्रमाणपत्र रद्द करण्याचा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला. अंतरवाली सराटीत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहे. कुणाच्या आदेशाने कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आले याचे नावच त्यांनी उघड केले. कोणत्या मंत्र्यांच्या आदेशाने हे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले हे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

जरांगे म्हणाले की, राज्यात सरकारकडून नवीन कट रचण्यात आला आहे. प्रमाणपत्र त्यांनीच द्यायचे आणि त्यांनीच रद्द करायचे. हा कट देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांकडून रचला जात आहे. एकनाथ शिंदे यांचे नाव मी तीन वर्षांत प्रथमच घेत आहे. सरकार मराठ्यांचे कसे वाटोळे करत आहे, हे मी सिद्ध करून दाखवणार आहे,” असा आरोप त्यांनी केला.

- Advertisement -

आमच्या मुलांच्या नरडीचा घोट घेणार असाल तर
माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले, “माझ्याविरोधात मोठा कट रचला गेला असून सरकारकडून मराठ्यांचे वाटोळं सुरू आहे. मला एकटं पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण या संपूर्ण कटाचा मी लवकरच पर्दाफाश करणार असून सगळी माहिती बाहेर आणणार आहे. भाजपमधील मराठा नेत्यांनीही हे लक्षात ठेवावे, हे तुमच्याच मुलांच्या भविष्याच्या विरोधात आहे. आमच्या मुलांच्या नरडीचा घोट घेणार असाल तर आम्ही शांत बसणार नाही, २०२९ च्या निवडणुकीत या सगळ्याचा हिशोब केला जाईल. एवढा मोठा बदला घेऊ की, तुम्ही आयुष्यात पाहिला नसेल. कांड्यावर मोजण्याइतकेही युती सरकारचे लोक निवडून येणार नाहीत,” असा इशाराही त्यांनी दिला.

लैंगिक अत्याचारप्रकरणी तरुण तेजपालला धक्का; उच्च न्यायालयाने ठरवलं दोषी

तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुसणार होतो
तीन वर्षांत पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांच्यावर मनोज जरांगे यांनी टीका केली. मनोज जरांगे म्हणाले की, तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुसणार होतो. सत्तेत गेलात म्हणून आमच्यावर माज उतरवणार का? शिंदे साहेब, तुम्ही डबल गेम खेळत आहात का? एकीकडून ओबीसी सांभाळत आहात का? परळीच्या टोळीवाल्याच्या नादी लागून तुमच्या ऑफिसला कसे येतात? मराठ्यांचा विरोध करणारे ओबीसी नेते तुमच्या बाळासाहेब भवनमध्ये येतात कसे? मराठ्यांचे काही समन्वयक तुम्ही माझ्या अंगावर घालत आहात. एकीकडे मी पण लागतो. तुमचाच एक नेता ज्याचे संभाजीनगरला कॉलेज आहे. तिथे माझ्या विरोधात बैठका होतात. मैत्री करावी तर ठासून करावी. तुमचा गद्दारीचा डाग पुसायला आम्ही मराठे आहोत. आमच्यावर उद्धव ठाकरे बरे म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका.

संजय शिरसाट यांच्या बंगल्यात बैठका झाल्या आहेत. तुमचे न येणारे सीट आम्ही कानाकोपऱ्यात निवडून आणले आणि तुम्ही आमचा गेम करणार का? यांचा माज जिरवावा लागेल. लाड भाऊमुळे तुमच्याशी मिळते-जुळते करत होतो. मी बापाला मानत नाही, तर तुम्ही कोण? इथून पुढे मराठ्यांनी राजकारणात पडू नये. व्हॅलिडिटी मिळाल्याशिवाय निवडणुकीला उभे राहू नका. मराठ्यांचे नेते म्हणवणारे राणे, विखे, चव्हाण, शेलार आता का बोलत नाहीत? आता पवार साहेब म्हातारे झाले आहेत. अजितदादा आणि शिंदे साहेबांना मराठ्यांनी तुटून मतदान केले. उद्धव ठाकरे बरे म्हणावे लागतील. तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुसला.

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग; अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

ज्योती दहिहांडे प्रकरणाचा उल्लेख
फडणवीस तुम्ही विनाकारण मराठे अंगावर घेत आहात. बावनकुळे (नोंदी) रद्द करायला सांगतो. यशवंता दहीहंडे यांची उर्दू मधील नोंद सापडली आहे. हिच नोंद ग्रामपंचायतमध्ये लावली. तुमचा (म्हणजे bjp) निवडून आला नाही म्हणून तुम्ही फोन करून रद्द करायला लावला. पुढे जरांगे पाटील लोकप्रतिनिधी यांचे पुरावे दाखवताना संतप्त झाले. “सरकारच्या एकाही अधिकाऱ्याकडे इतके पुरावे नसतील… तेवढे दाखवत आहे. बावनकुळे यांनी सांगितलं की नोंदी रद्द करा. त्यांनी endoncement करून पत्र दिलं. 15 लाख रुपये द्या म्हणतात, ऑफ रेकॉर्ड बोलतात. 15 लाख रुपयासाठी रद्द करता का?” असे ते म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळेंची नार्को टेस्ट करा
आपला पक्षाचा उमेदवार निवडून आला नाही म्हणून हजारो लोकांचे भवितव्य उद्ध्वस्त करणार का, असा सवाल करत जरांगे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर थेट आरोप केला. “बावनकुळे यांच्या सांगण्यावरूनच ही प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणीदेखील जरांगे यांनी केली. एका बावनकुळेंना एवढी ताकद देणार असाल, तर आम्ही तुमचे १५ ते २० आमदार पाडू,” असा थेट इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.

ताज्या बातम्या

Nashik News : सुट्टीमुळे सप्तशृंगी गड घाटात वाहतूक कोंडी; भाविक संतप्त

0
सप्तशृंगीगड | वार्ताहर | स्वातंत्र्यदिनाच्या लांब सुट्टीमुळे श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर (Saptashrungi Gad Ghat) दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यामुळे गडाकडे जाणाऱ्या घाट...