Wednesday, September 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजManoj Jarange Patil: "संध्याकाळपर्यंत बघू काय करतात..."; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला अल्टिमेटम,...

Manoj Jarange Patil: “संध्याकाळपर्यंत बघू काय करतात…”; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला अल्टिमेटम, म्हणाले तळतळाट घेऊ नका…

छत्रपती संभाजीनगर | Chhatrapati SambhajiNagar
कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या तक्रारींवरुन राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे आंदोलन करण्याच्या निर्णयावर ठाम असून, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मराठा समाजाला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. “आळस झटकून टाका, पेटून उठा आणि घराबाहेर पडा,” अशा आक्रमक शब्दांत त्यांनी समाजाला आंदोलनासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा अल्टीमेटम दिले असून आजचा त्याचा शेवटा दिवस असून उद्यापासून ते अंतवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार आहे. त्यांनी राज्य सरकार विशेषतः उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कडाडून हल्ला चढवला.

- Advertisement -

आळस, मरगळ सगळी झटकून टाका
मनोज जरांगे म्हणाले, “संध्याकाळपर्यंत बघू काय होतंय. कुणीतरी आपल्याला भेटायला येईल या आशेवर समाज मोठा होत नसतो. माझं मराठा समाजाला आवाहन आहे. विखे पाटलांनी काल संभाजीनगरला आढावा घेतला. त्यांनी सांगितलं की अर्ज नाहीये. तुम्ही अर्ज दिलेले माहितीय मला, पण ते आपल्यालाच उलटं बदनाम करतायत. मराठ्यांमध्ये उदासीनता आहे असं ते म्हणतायत. ते आपल्याला हिणवतायत. तुम्ही घरात बसून राहू नका, बाहेर पडा आपल्या लेकरा-बाळांसाठी. मी वारंवार तुम्हाला सांगतोय, मुलांचं वाटोळं करू नका. आपल्यातला आळस, मरगळ सगळी झटकून टाका. ज्या मराठ्यांनी अर्ज दिले पण जे स्वीकारले गेले नाहीत त्यांनी या. ज्यांची नोंद सापडली त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं नाही त्यांनी या,” असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले.

Nashik News: पेठ तालुक्यातील ११ पर्यटक काठमांडूत अडकले; दूतावासाशी संपर्क, मदतीसाठी प्रयत्न सुरू

आम्ही आमच्या निर्णयावर ठाम
मनोज जरांगे पुढे म्हणाले की, म्हणाले, संध्याकाळपर्यंत बघू काय करतात काही नाही ते, आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. ज्यांना भेटायचं ते येतील, माझी क्षमता आहे. 29 ऑगस्टच्या आंदोलनामध्ये एकही गोष्ट मागे ठेवणार नाही. देवेंद्र फडणवीस जसे सांगतात तसं विखे बोलत आहेत. ते सांगत आहेत मराठ्यांमध्ये उदासीनता आहे. ज्यांची नोंद सापडली तरी अधिकाऱ्यांनी कुणबी प्रमाणपत्र दिले नाहीत किंवा अर्ज घेतला नाही त्यांनी अंतरवालीमध्ये या.

तळतळाट घेऊ नका
आताच चान्स आहे. पाऊस-पाणी नाही, नोकरी नाही. किमान शेतात काही चुकलं नाही तर नोकरीत काहीतरी मिळेल. विखे यांना हे दिसत नाही. कलेक्टरला घेऊन बसतात. मी त्यांना सांगितलं होतं, तुम्ही कलेक्टरला घेऊन न बसता तहसीलदारांना घेऊन बसा. तुम्ही एसडीएमला आणि जात पडताळणी अधिकाऱ्याला घेऊन बसा विखे तुम्ही पागल झालात की मराठे तुम्हाला पागल करायचे आहेत, इथे तुम्ही शहाणे व्हा. मराठे चिडले तर… विखे, फडणवीस, शिंदे तळतळाट घेऊ नका.

गूळ निघाला की ढेकळ निघाला एवढंच कळतं
विखे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना जरांगे म्हणाले, “त्याला काहीच माहित नाही. त्याला काहीच कळत नाही. त्यांना कारखाना, त्यातून साखर बारीक का जाड निघाली, गूळ निघाला की ढेकळ निघाला एवढंच कळतं, असे त्यांनी म्हटले. बावनकुळे यांनी केलेल्या एका दाव्याचाही जरांगे यांनी उल्लेख केला. “बावनकुळे 22 लाख म्हटले. यांना विचारलं तर एवढे नसतील ते म्हणाले. अन् तुम्हाला मराठ्यांचा देव व्हायचं? इथे तुम्हाला मराठ्यांच्या उपसमितीचा अध्यक्ष केलं. तुम्ही किती वेड्यात काढणार, किती फसवणार आहात? असा सवाल त्यांनी केला.

नाहीतर तुमच्या हातात अधिकार राहणार नाहीत
नोंदी 58 लाख आम्ही शोधल्यात. हे मीडियासमोर आम्ही वदवून घेतले होते. यांना 58 लाखांमधील नोंदी कमी करायच्या आहेत,” असा आरोप जरांगे यांनी केला. विखे पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई, लाड भाऊ, तुम्ही सावध व्हा. चांगला, योग्य जीआर मराठ्यांना देऊन टाका. नाहीतर तुम्हाला अधिकारामध्ये आम्ही ठेवणार नाही. नाहीतर तुमच्या हातात अधिकार राहणार नाहीत,” असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला. मुंबईतील आंदोलनाबाबतही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “संभ्रम ठेवत नाही. 29 ऑगस्टला अंतरवालीमध्येच आंदोलन होणार. यांनी दिलं नाही तर मुंबईत होणार. पाच टप्प्यात सहा कोटी मराठा मुंबईत जाणार,” असा दावा त्यांनी केला.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata बुधवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 305 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 4734 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर...