Tuesday, December 10, 2024
Homeनाशिकतरुणास मारहाण केल्याप्रकरणी येवला तहसील कार्यालयावर मोर्चा

तरुणास मारहाण केल्याप्रकरणी येवला तहसील कार्यालयावर मोर्चा

येवला | प्रतिनिधी | Yeola

शहरात मातंग समाजातील (Matang Community) युवक प्रसाद सुनिल खैरनार यांस मारहाण (Beating) करणाऱ्या सर्व आरोपींना तात्काळ अटक (Arrested) करून कठोर शासन व्हावे व प्रसाद खैरनार याच्यावरील पोक्सो गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी येवला तहसील कार्यालयावर (Yeola tehsil Office) सकल मातंग समाजाच्या वतीने मोर्चा (March) काढण्यात आला.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Accident News : उभ्या असलेल्या कंटेनरवर कार जाऊन धडकल्याने भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

गुरुवारी (दि. ११) रोजी सकाळी विंचूर चौफुली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. तहसीलदार आबा महाजन (Aaba Mahajan) यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी याप्रकरणात सहा पैकी तीन आरोपी अटक करण्यात आले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल, असे सांगितले.

हे देखील वाचा : Nashik News : गांज्याचे कनेक्शन तेलंगाणा व्हाया नाशिक

दरम्यान, यावेळी मातंग समाजातील युवक प्रसाद सुनिल खैरनार यांस गंभीर मारहाण करून अर्ध नग्न करत व्हिडिओ प्रसारित केलेल्या आरोपींना अटक झालेली नसून उलट प्रसाद खैरनार यांच्यावरच पोस्को गुन्हा दाखल करून दबाव आणला जात असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच सदर घटनेसंदर्भात मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेबद्दल नाराजीही व्यक्त करण्यात आली.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या