Monday, November 11, 2024
Homeनाशिकशासनाच्या योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे काम आदर्शवत - मंत्री...

शासनाच्या योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे काम आदर्शवत – मंत्री भुजबळ

नाशिक | Nashik

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) माहिती व लाभ जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत पोहचविण्यात अंगणवाडी सेवका व मदतनीस यांचे काम आदर्शवत असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले. आज येवला शहरातील माऊली लॉन्स येथे आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण-अंगणवाडी सेविका मदतनीस सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

- Advertisement -

यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप पाटील, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, नायब तहसीलदार पंकज मगर, महिला बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी वंदना शिंपी यांच्यासह अधिकारी, अंगणवाडी सोविका व मदतनीस मोठ्या संख्यने उपस्थित होत्या.

हे देखील वाचा : Ajit Pawar : अमित शाहांसमोर ‘बिहार पॅटर्न’प्रमाणे मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव ठेवला का? अजित पवार म्हणाले…

यावेळी मंत्री भुजबळ म्हणाले की, राज्यातील महिलांना (Women) सक्षम व कार्यक्षम करण्यासाठी शासनाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली. यासोबतच महिला सक्षमीकरणासाठी शिक्षणासह रोजगाराच्या अनेक योजना शासनामार्फत (Government) राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्याचे अधिकार यापुढे केवळ अंगणवाडी सेविकांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या कामात प्रत्येक लाभार्थी महिलेचा अर्ज भरण्यासाठी रूपये ५० मानधन देण्यात येत आहे. आज येवला तालुक्यातील १ लाख ८ हजार ६३ महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ देण्यात आला असून या योजनेच्या अंमलबजावणीचे श्रेय अंगणवाडी सेविकांना जाते. गोर गरीबांची सेवा करण्याची संधी शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर दिली आहे. या संधीच सोन करावे असे आवाहन त्यांनी केले.

तसेच बालकांना (Children) पोषण आहार, प्राथमिक शिक्षण, आरोग्य विषय सुविधा, लसीकरण, कुपोषण रोखण्याचे महत्वपूर्ण काम अंगणवाडी सेविका व मदतनीस करतात. त्यांचे हे काम अतिशय महत्वाचे आहे.देशाचे भविष्य घडविण्याची जबाबदारी पालकांनंतर अंगणवाडी सेविका करतात. शिक्षणासोबतच शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे कामही अंगणवाडी सेविक करतात, त्यामुळे त्यांच्या या कामास तोड नाही अशा शब्दात मंत्री भुजबळ यांनी कौतुक केले.

हे देखील वाचा : Nashik Crime News : दाेन हत्या उघड; मात्र आराेपी अद्यापही मोकाटच

मंत्री भुजबळ पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना ४६ हजार कोटी रुपये देण्यात येणार आहे.महिलांच्या खात्यातून पैसे कपात करणाऱ्या बँकावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे. त्यामुळे योजनेचे पूर्ण पैसे महिलांना मिळणार आहे. सर्व स्तरावर महिलांचा सन्मान करण्याचे त्यांना शक्ती देण्याचे काम महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. राज्यातील १५ लाख भगिनींना लखपती दीदी बनविण्याचे शासनाचे धोरण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, कार्यक्रमाच्या (Program) सुरुवातीला मंत्री छगन भुजबळ व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्रमात ११ अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा प्रातिनिधीक स्वरूपात मंत्री भुजबळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप पाटील यांनी केले. तर आभार महिला बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी वंदना शिंपी यांनी मानले.

हे देखील वाचा : Nashik News : फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल

मंत्री भुजबळ यांच्या हस्ते फायर बाईकचे लोकार्पण

येवला नगरपालिकेच्या अग्निशामक विभागात नव्याने दाखल झालेल्या दोन फायर बाईकचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या फायर बाईकच्या माध्यमातून येवला शहरातील अडचणीच्या भागात आगीवर नियत्रंण मिळविणे शक्य होणार आहे. यावेळी येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत भोये, अग्निशामक प्रमुख सागर झावरे, करनिरीक्षक आदित्य मुरकुटे, आस्थापना प्रमुख बाळू पारधे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या