Monday, April 6, 2026
Homeदेश विदेशMonalisa Bhosle: मी लग्न केलं आहे हा लव्ह जिहाद…; फरमान खानसोबत लग्नानंतर...

Monalisa Bhosle: मी लग्न केलं आहे हा लव्ह जिहाद…; फरमान खानसोबत लग्नानंतर मोनालिसा नेमकं काय म्हणाली?

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
२०२५ मध्ये जो कुंभमेळा झाला त्यात मोनालिसा नावाच्या एका मुलीचे व्हिडीओ आणि फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. ही मुलगी रुद्राक्ष विकत होती. त्यानंतर तिला एक चित्रपट मिळाला तेव्हाही तिची चर्चा झाली होती. तिचे आकर्षक सौंदर्य आणि तिचे खास असे घारे डोळे यामुळे मोनालिसा भोसले हे नाव चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा तिची चर्चा होते आहे कारण तिने प्रियकर फरमान खानशी लग्न केले आहे.

कुटुंबियांचा विरोध झुगारुन तिने बॉयफ्रेंड फरमान खानशी लग्न केले. केरळला पळून जात तिने फरमानशी लग्नगाठ बांधली. मोनालिसाला सिनेमात ब्रेक देणारे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी या प्रकरणाला लव्ह जिहादचा अँगल दिला. तसेच मोनालिसा अल्पवयीन आहे अशीही एक चर्चा झाली. आता या सगळ्या चर्चांवर मोनालिसा भोसले आणि तिचा पती फरमान खानने पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे.

- Advertisement -

Rahul Gandhi: “आपण कोणाकडून तेल खरेदी करायचं…”; राहुल गांधींचे केंद्र सरकारवर टीकास्त्र

मोनालिसा भोसलेने काय म्हंटले
माझं जे लग्न झालं आहे ते हिंदू रिती रिवाजाने झालं आहे. माझा प्रियकर फरमान माझ्याशी लग्न करु इच्छित नव्हता. पण मीच त्याला सांगितलं की आपण लग्न करु. माझे आई वडील दुसऱ्या मुलाशी माझं लग्न लावून देणार होते. मला तो मुलगा पसंत पडला नाही. ज्या मुलाशी माझं लग्न लावून देणार होते तो माझ्या आत्याचा मुलगा होता. तो माझा भाऊ आहे, मी त्याच्याशी लग्न कसं करणार? माझे वडील आले आहेत. पण ते आमच्या लग्नाला आले नव्हते. त्यांना हे माहीत आहे की आम्ही लग्न केलं आहे. ते थोडे नाराज आहेत. मी हिंदू रिती रिवाजाने लग्न केलं आहे. माझं लग्न म्हणजे लव्ह जिहाद नाही. मी सगळ्या धर्मांना मानते. आम्ही कलाकार आहोत आमच्यासाठी सर्व धर्म एकच आहे. मी सगळ्या धर्माला एक मानते.” मी लग्न केलं आहे हा लव्ह जिहाद नाही असं मोनालिसा भोसलेने म्हटलं आहे. तसंच तिचा नवरा फरमाननेही महत्त्वाचं विधान केलं आहे.

फरमान खान काय म्हणाला?
फरमान म्हणाला मोनालिसा आणि माझं लग्न झालं असलं तरीही ती हिंदूच आहे मी मुसलमान आहे. आम्ही दोघांनीही धर्म बदलून लग्न केलेलं नाही. कलाकार हा कलाकार असतो त्याला धर्म नसतो. मी एक अभिनेता म्हणून काम करतो. मल्याळम सिनेमात काम करतो, हिंदीत काही छोट्या मोठ्या भूमिका केल्या आहेत. मोनालिसाशी मी हिंदू रितीरिवाजाने लग्न केलं आहे. माझं आणि मोनालिसाचं प्रेम आहे त्यामुळे आम्ही लग्न केलं आहे. त्यासाठी धर्मांतर आवश्यक नाही. मी मूळचा उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातला आहे. मोनालिसा भोसले हे माझं नाव आहे. मी कायद्याने सज्ञान आहे. माझं आडनाव भोसले आहे. मोनालिसाचा जन्म २००८ चा आहे. मध्य प्रदेश सरकारचा जन्म दाखला आमच्याकडे आहे. मोनालिसा अल्पवयीन नाही तर १८ वर्षांची आहे असंही फरमान खानने सांगितलं. आता आम्ही स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत रजिस्टर पद्धतीनेही लग्न करणार आहोत.”

ताज्या बातम्या

Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसचा लढण्याचा निर्णय योग्य, राजकारणातील...

0
नवी दिल्ली | New Delhi राज्यातील बारामती आणि राहुरी (Baramati and Rahuri) या विधानसभांच्या पोटनिवडणुकीसाठी आज (सोमवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यात बारामतीमधून महायुतीकडून...