Tuesday, September 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोशी इमारत दुर्घटनेचं ७० तासांनंतरही बचावकार्य सुरुच; इमारतीबाबत धक्कादायक माहिती आली समोर

मोशी इमारत दुर्घटनेचं ७० तासांनंतरही बचावकार्य सुरुच; इमारतीबाबत धक्कादायक माहिती आली समोर

पिंपरी चिंचवड | Pimpri Chinchwad
पिंपरी चिंचवडच्या मोशी इथे झालेल्या दुर्घटनेचं शोधकार्य अजूनही सुरूच आहे. ७० तास उलटले तरी अद्याप बचावकार्य सुरुच आहे. आता दुर्घटनाग्रस्त इमारतीचा काँक्रिटचा भाग तोडण्यासाठी अत्याधुनिक डिमॉलिशन एस्कव्हेटर मशीनचा आधार घेण्यात आला आहे. या मशीनद्वारे इमारतीचा अस्थिर भाग स्थिर करण्यासाठी तसेच इमारतीत सुरक्षित प्रवेश करण्यासाठी नवा मार्ग तयार करण्यासाठी या मशीनचा वापर वापर करण्यात येत आहे. असे असतानाच या दुर्घटनाग्रस्त तीन मजली इमारतीबाबत धक्कादायक आणि गंभीर माहिती समोर आली आहे.

पिंपरी चिंचवडमधील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या या इमारतीबाबत गंभीर बाब समोर आली असून दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या केवळ तळमजल्यालाच महापालिकेच्या बांधकाम विभागाने २७ जुलै २०२३ रोजी पूर्णत्वाचा दाखला दिला असल्याचे उघड झाले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशींना पत्रकारांनी याबद्दल विचारले असता. आपला दावा फोल ठरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या आधीच्या दाव्यावरुन घुमजाव करत मी आधीचे तुम्हाला याप्रकरणाची चौकशी करतो असे म्हटलेय. त्यामुळे पहिला आणि दुसरा मजल्याला पूर्णत्वाचा दाखला होता की नाही? हे चौकशीत समोर येईल. असे म्हणत विजय सूर्यवंशींनी बोलणे टाळले.

- Advertisement -

पुर्णत्वाचा दाखला देण्याची घाई
यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे, महापालिकेच्या पर्यावरण विभागाने २६ जुलै रोजी सुधारित बांधकामाची परवानगी मागितली आणि बांधकाम विभागाने कोणतीही प्रत्यक्ष पाहणी न करता अवघ्या २४ तासांत, म्हणजेच २७ जुलैला घाईघाईने पूर्णत्वाचा दाखला मंजूर करण्याची संशयास्पद तत्परता दाखवली. केवळ तळमजल्याची परवानगी असताना वरचे दोन बेकायदेशीर मजले कोणाच्या वरदहस्ताने उभे राहिले आणि तिथे कामगारांना काम करण्याची परवानगी कोणी दिली, असे गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

संपादकीय : ११ जुलै २०२६ : ई-२० चा गदारोळ अन् संभ्रमाचे मळभ

नेमके काय झाले?
पुण्यातील मोशी परिसरातील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात कचऱ्याचा प्रचंड ढिगारा घसरून प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. मोशीतील ही दुर्घटना बुधवार, ८ जुलै २०२६ रोजी घडली. मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोमधील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या तीन मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळला. या दुर्घटनेत अनेक २३ कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकले त्यातील १४ जणांना बाहेर काढण्यात यश आले असून एकाचा मृत्यू झाला असून NDRF, अग्निशमन दल व इतर यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू करण्यात आले.

सुरुवातीला अनेक जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले, मात्र काही कर्मचारी अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. बचावकार्यासाठी NDRF, अग्निशमन दल, लष्कर आणि इतर आपत्कालीन यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत अस्थिर इमारतीमुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. या घटनेनंतर कचरा व्यवस्थापन, सुरक्षा उपाययोजना आणि प्रशासकीय निष्काळजीपणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

ताज्या बातम्या

चौकशीसाठी आलेल्या पथकासमोरच प्राध्यापकाचा हृदयविकाराने मृत्यू

0
मालेगाव | प्रतिनिधी Malegaon येथील मुनिसिपल हायस्कूल व जूनियर कॉलेजमध्ये आज चौकशीसाठी आलेल्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यां समोर एका प्राध्यापकास सततच्या चौकशीचे मानसिक तणावाने कार्यालयातच...