Monday, September 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMPSC पेपरफुटीप्रकरणी मोठी कारवाई; आयोगाच्या ३ अधिकाऱ्यांसह ६ जणांना अटक

MPSC पेपरफुटीप्रकरणी मोठी कारवाई; आयोगाच्या ३ अधिकाऱ्यांसह ६ जणांना अटक

मुंबई | Mumbai
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) भरती परीक्षेच्या कथित पेपरफुटी प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणाच्या तपासात मोठी कारवाई करत MPSCशी संबंधित तीन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये खासगी क्लासचालक आणि त्याच्या नातेवाईकांचाही समावेश असल्याचे समजते आहे.

या प्रकरणामुळे राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीच विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील मोठ्या प्रमाणातील प्रश्न परीक्षा होण्यापूर्वीच व्हॉट्सॲपवर फिरत असल्याचा आरोप केला होता. काही विद्यार्थ्यांनी १०० पैकी ७८ ते ९० प्रश्न आधीच उपलब्ध असल्याचा दावा केला होता.

- Advertisement -

पेपरफुटीचा तपास पुढे जात असताना प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी नेमकी कोणाच्या माध्यमातून बाहेर आली, ती कोणाकोणापर्यंत पोहोचली आणि त्यातून आर्थिक व्यवहार झाले का, याचा तपास केला जात आहे. याच तपासातून खासगी क्लासचालक आणि त्याच्या नातेवाईकांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणात संबंधित क्लासमधील मोठ्या संख्येने प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नांशी जुळल्याचा दावा केला होता. तसेच पेपर शेअर करणारा उमेदवार आणि संबंधित क्लासचालक हे दोघेही नंदुरबारचे असल्याचा दावा त्यांनी केला होता.

Nashik Onion News : शासकीय कांद्याची दिल्लीवारी; आज लासलगावहून ८४० टन कांदा रवाना होणार

लव्ह स्टोरीची चर्चा
एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतील पेपरफुटीच्या घटनेतील घटनाक्रम थक्क करणारा आहे. या संपूर्ण प्रकाराला एक लव्ह स्टोरी कारणीभूत असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका प्रियकराने एमपीएससीमध्ये अगदी एका खालच्या कर्मचाऱ्याशी संधान साधून हा प्रकार केल्याचे बोलले जाते आहे. त्यामुळे फुटलेला पेपर केवळ एकालाच मिळाला, अशीही माहिती तपासातून पुढे आली आहे. पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत.

तपासातील प्राथमिक निष्कर्षानुसार हा फुटलेला पेपर केवळ एकाच उमेदवारापर्यंत पोहोचला होता. मात्र, परीक्षेची गोपनीयता आणि पारदर्शकता अबाधित ठेवण्यासाठी आयोगाने संपूर्ण परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेतला, ज्याचा फटका इतर प्रामाणिक विद्यार्थ्यांना बसला आहे.

२ मार्चच्या परीक्षेवर संशयाची छाया
अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक (गट-ब) पदासाठी २२ मार्च २०२६ रोजी परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेच्या आधीच प्रश्नपत्रिकेतील प्रश्न कथितरीत्या काही उमेदवारांपर्यंत पोहोचल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत MPSCने प्राथमिक चौकशी केली. चौकशीत गैरप्रकाराच्या आरोपांना पुष्टी देणारे प्राथमिक तथ्य समोर आल्यानंतर आयोगाने संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करून फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...