Sunday, September 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMSRTC News: मोठी बातमी! एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ; परिवहन मंत्र्यांची...

MSRTC News: मोठी बातमी! एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ; परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई | Mumbai
राज्य परिवहन (एसटी) महामंडळ कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज विधानसभेत केली. प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत निवेदन जारी करत ही घोषणा केली.

महागाई भत्त्यात वाढ
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा विचार करत महायुती सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता थेट ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज विधानसभेत केली. याशिवाय, कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यातही लक्षणीय वाढ करण्यात आली आहे.

- Advertisement -

Nashik News: भावडबारी घाटात पहिल्याच पावसात दरड कोसळली, डोंगराभोवती संरक्षक लोखंडी जाळी बसवण्याची मागणी

एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, हे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच सरकारने कर्मचाऱ्यांना मोठी वेतनवाढ जाहीर करून एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयाची घोषणा करताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “कालच मी एसटी महामंडळाच्या सर्व युनियनची बैठक घेतली होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सेवा देणाऱ्या ८६ हजार कर्मचाऱ्यांच्या न्यायहक्काला दाद देणे हे आमचे कर्तव्य आहे. महाविकास आघाडीच्या काळात एसटीचा संप भरकटला होता, मात्र आमच्या सरकारने कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घेतल्या आहेत.”

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर आता एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून वाढवून ५८ टक्के करण्यात आला आहे. तर, यापूर्वी मिळणारा ८, १६ आणि २४ टक्के घरभाडे भत्ता वाढवून आता अनुक्रमे १०, २० आणि ३० टक्के करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांचा वार्षिक वेतन वाढीचा दर आता २ टक्क्यांवरून ३ टक्के करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजकारणात टीका करताना लक्ष्मणरेषेचे भान ठेवा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राजकीय टीका करताना कौटुंबिक विषय टाळले पाहिजेत. आमच्यावर राजकीय टीका करा, आमच्या कार्यपद्धतीवर किंवा सरकारच्या कामावर टीका करा, मात्र कौटुंबिक वादात...