Thursday, November 12, 2026
Homeक्राईमNashik Crime News: मंतरलेल्या धाग्याची ९०० रुपयांत विक्री; पोलिसांकडे चौकशीसह २१ लाखांच्या...

Nashik Crime News: मंतरलेल्या धाग्याची ९०० रुपयांत विक्री; पोलिसांकडे चौकशीसह २१ लाखांच्या आवाहनाची मागणी

नाशिक | प्रतिनिधी
नागरिकांच्या धार्मिक भावनांचा आणि अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका ऑनलाईन फलज्योतिषाचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) पर्दाफाश केला आहे. काळा दोरा मंतरलेला दिव्य धागा म्हणत ९०० रुपयांना विकणाऱ्या या भोंदूवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी अंनिसने नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सोशल मीडियावरून प्रसारित केलेल्या मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की, आश्विन किंवा चैत्र नवरात्रात मंत्र सिद्धी केलेला काळा धागा उजव्या हाताच्या मनगटावर बांधल्यास शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि रखडलेल्या कामांमध्ये यश मिळते. या तथाकथित धाग्यासाठी ऑनलाइन ९०० मागितले जात असून गूगल पे द्वारे पैसे स्विकारून पोस्टाने धागा पाठवण्याचे आमिष दाखवले जात आहे.

- Advertisement -

जंतर-मंतरवर प्रवेश करताच CJP नेते पुन्हा ताब्यात; सौरव दास, आशुतोष रांका यांच्यासह तिघांवर दिल्ली पोलिसांची कारवाई!


यात अनेक लोकांची फसवणूक झाल्याची दाट शक्यता असल्याने या ज्योतिषाचे बँक खाते तातडीने गोठवून सखोल चौकशी करावी. जर हा फलज्योतिषी चमत्कारी दाव्यांवर ठाम असेल, तर त्याने अंनिसच्या अटी व शर्तीनुसार आधुनिक विज्ञानाच्या कसोट्यांवर हे सिद्ध करून दाखवावे. सिद्ध करणाऱ्यास २१ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. पुढील ७ दिवसांत हे आव्हान स्वीकारावे, असे लेखी आवाहनही करण्यात

सिंहस्थापूर्वी स्वतंत्र पथक उभारावे
नाशिकमध्ये विशेषतः पंचवटी परिसरात अशा भोंदू बुवांचा सुळसुळाट असण्याची शक्यता आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धेचे गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी आतापासूनच स्वतंत्र विशेष पथक तैनात करावे. लोकांच्या अज्ञानाचा आणि दैवी तोडग्यांवरील विश्वासाचा फायदा घेऊन मोठी आर्थिक लूट सुरू आहे. पोलिसांनी या ऑनलाईन भोंदूगिरीवर वेळीच चाप लावावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. टी. आर. गोराणे, कृष्णा चांदगुडे व रंजन लोंढे यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार? शिवसेनेच्या ‘या’ नेत्याने उडवली...

0
मुंबई | Mumbai एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. गुलाबराव पाटलांच्या सूचक...