Tuesday, September 8, 2026
HomeनाशिकShalarth ID Scam : घोटाळ्यातून बांधला तीन कोटींचा बंगला, शिक्षक आयडी मंजुरीसाठी...

Shalarth ID Scam : घोटाळ्यातून बांधला तीन कोटींचा बंगला, शिक्षक आयडी मंजुरीसाठी २० ते ४० लाखांचा रेट; वाडिलेचे साम्राज्य पाहून तपास यंत्रणाही चक्रावल्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

उत्तर महाराष्ट्रातील (Uttar Maharashtra) शिक्षण क्षेत्रात घडलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याचा (Shalarth ID Scam) धुळे व जळगावचा मुख्य एजंट प्रशांत तुळशीराम वाडिले याच्या अटकेनंतर (Arrested) आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. एखाद्या कॉर्पोरेट कंपनीप्रमाणे वाडिले याने शिक्षण विभागात लाचखोरीचे आणि कमिशनचे जाळे तयार केले होते. शिक्षण विभागाच्या पैशांवर (Money) तब्बल ५० टक्के डल्ला मारणारी स्वतंत्र यंत्रणा आणि कागदोपत्री ६५ शाळांचे उभे केलेले त्याचे साम्राज्य पाहून तपास यंत्रणांचेही डोळे पांढरे झाले आहेत.

- Advertisement -

नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेने (इओडब्ल्यू) शनिवारी धुळ्यात (Dhule) सापळा रचून वाडिलेला बेड्या ठोकल्या असून, नाशिकरोड न्यायालयाने त्याला येत्या १७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, वाडिले याने शालार्थ आयडी मिळवून देण्यासाठी प्रत्येक संशयित शिक्षकाकडून (Teacher) २० लाख रुपयांचा फिक्स रेट ठरवला होता. या पैशांची वाटणीही पद्धतशीरपणे केल्याचे समोर आले आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : हिरावाडीत गाेळीबाराचा थरार; थेट संशयिताच्या आईवर फायरिंग, चाैघे अटकेत

वाडिले हा स्वतः कडे १० ते १२ लाख रुपये ठेवून उर्वरित ८ ते १० लाख रुपये संबंधित वेतन पथक अधीक्षक कार्यालय, शिक्षण उपसंचालक आणि कार्यालयीन लिपिक यांच्यापर्यंत पोहोचवित होता. दरम्याम, या गुन्ह्याचा तपास पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांच्या आदेशाने गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त संदीप मिटके, आर्थिक गुन्हेशाखेचे वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके करत आहेत. त्यामुळे आता काही शिक्षक, अधिकारी व एजंट रडारवर आले आहेत.

कागदावर ६५ शाळा, प्रत्यक्षात मात्र…

राजकीय वजनाचा वापर करून वाडिले याने कागदोपत्री (Documents) ६५ पेक्षा अधिक आश्रमशाळा आणि शाळांचे जाळे दाखवले होते. मात्र, पोलिसांनी जेव्हा प्रत्यक्ष जमिनीवर तपास केला, तेव्हा साक्री आणि शिंदखेडा भागात केवळ २ संस्था प्रत्यक्षात अस्तित्वात असल्याचे उघड झाले आहे. उर्वरित सर्व संस्था केवळ बनावट कागदपत्रे, बनावट नियुक्ती आदेश आणि शिक्षण विभागाच्या बोगस प्रमाणपत्रांच्या जोरावर शासकीय तिजोरी लुटण्यासाठीच तयार करण्यात आल्या होत्या, असेही निष्पन्न झाले आहे.

हे देखील वाचा : Shalarth ID Scam : पासष्ट शाळांचे बोगस जाळे; धुळे जिल्हा रिपाइं शिक्षक आघाडीचा अध्यक्ष गजाआड

फरकावर ५० टक्के कमिशन

शिक्षकांचे वैद्यकीय बिल मंजूर करणे किंवा मागील वेतनाचा फरक काढून देण्यासाठी वाहिलेची एक स्वतंत्र वसुली यंत्रणा कार्यरत होती. फरक काढून देण्यासाठी तो ५० टक्के कमिशन उकळत होता. या कमिशनमधील काही पाटा तो संबंधित वेतन पथक, विस्तार अधिकारी आणि उपशिक्षणाधिकाऱ्यांना वाटून स्वतः नामानिराळा रहात होता.

वाडिलेची सध्याची मालमत्ता

  • धुळ्यात ४ गुंठ्यांत तीन कोटींचा आलिशान बंगला.
  • कार, दुचाकी वाहने, विविध भागात फ्लॅट्स.
  • धुळ्यात अनेक ठिकाणी जमिनींची खरेदी
  • २७ शिक्षकांचे शालार्थ आयडी मंजूर केल्याची कबुली.
  • नाशिकचे एजंट रडारवर
  • ते २७ शिक्षक कोण, याचा तपास सुरू.
  • प्रत्येक शिक्षकाने वीस लाख रुपये देऊन आयडी मिळविला.
  • वाडिले याने आतापर्यंत ३० कोटींचा अपहार केल्याचा संशय

ताज्या बातम्या

क्रीडापटूंच्या नोकर भरतीसाठी सुधारित आरक्षण धोरण – राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय आणि इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५ टक्के आरक्षणाबाबत सुसूत्रता तसेच एकसंधता आणण्यासाठी सुधारित धोरण लागू करण्यास मंगळवारी...