पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
पंचवटीतील (Panchvati) मालेगाव स्टॅण्ड परिसरात (Malegaon Stand Area) आज (सोमवारी) सकाळी येथे उभ्या असलेल्या एका मारुती ओमनी व्हॅनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह (Dead Body) आढळून आला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. परंतु, हा मृतदेह नेमका कुणाचा आहे याची माहिती मिळालेली नव्हती. त्यानंतर आता या मृतदेहाची माहिती समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मालेगाव स्टॅण्ड परिसरात उभ्या असलेल्या मारुती ओमनी (एमएच १५ जीआर ८९७४) वाहनामध्ये मृतदेह आढळून आलेल्या व्यक्तीचे नाव शुभम बाळु पवार (वय ४१) असे असून, तो त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) पेगलवाडी येथील रहिवासी आहे. ओमनीच्या मागील दोन सीटांमधील मोकळ्या जागेत हा मृतदेह आढळून आला होता. तसेच मृताच्या डोक्याला गंभीर दुखापत आणि वाहनात व रस्त्यापर्यंत थेट रक्ताचे ओघळ पसरलेले होते.
हे देखील वाचा : Nashik Crime News : पंचवटीत ओमनी व्हॅनमध्ये आढळला रक्ताने माखलेला मृतदेह; तीन दिवसांपासून उभी होती गाडी
दरम्यान, स्थानिक नागरिकांच्या (Local Citizen) ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. यानंतर पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्यासह इतरांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात (Civil Hospital) पाठवण्यात आला आहे.
गाडी तळेगावची
प्राथमिक माहितीनुसार, सदर ओमनी व्हॅन मोहन भैरू भगत (रा. तळेगाव, महिरावणी) यांच्या मालकीची असल्याचे तपासात समोर आले आहे. मालेगाव स्टॅण्ड व पंचवटी परिसरात रात्री उशिरापर्यंत नागरिक आणि भाविकांची गर्दी असते. एवढ्या गर्दीच्या ठिकाणी तीन दिवसांपासून ही व्हॅन उभी असूनही हा प्रकार उशिराने उघडकीस आल्यामुळे नागरिकांमधून उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.




