Thursday, May 21, 2026
Homeक्राईमNashik Crime News : दिंडोरी पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 'इतक्या' लाखांचा अवैध...

Nashik Crime News : दिंडोरी पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा अवैध गुटखा, तंबाखू जप्त

ओझे | वार्ताहर | Oze

दिंडोरी पोलीस ठाण्याच्या (Dindori Police Station) हद्दीत अवैध गुटखा वाहतुकीवर पोलिसांनी (Police) मोठी कारवाई करत तब्बल ७१,८३,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एकाला अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. पोलीस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे व पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार दिंडोरी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : तगादा लावू नकोस, अन्यथा देवाचा कोप होईल; खरातने कांदा व्यापार्‍यालाही धमकावले

मिळालेल्या अधिक माहिती अशी की, आज (दि.०५ एप्रिल) रोजी पहाटे १२:३० वाजेच्या सुमारास पेठ-नाशिक महामार्गावरील (Nashik-Peth Highway) चाचडगाव शिवारात पोलिसांनी सापळा रचला होता. यावेळी संशयास्पद वाटणाऱ्या टाटा कंटेनर (एमएच ०५ एम १८२१ ) या वाहनाला अडवून तपासणी केली असता त्यात शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला व सुगंधी तंबाखू मोठ्या प्रमाणात आढळून आला. या कारवाईत ५१,७८,४०० रुपयांचा गुटखा व तंबाखू साठा तसेच अंदाजे २० लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण ७१,८३,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा माल गुजरात राज्यातून कर बुडवून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

हे देखील वाचा : Devendra Fadnavis : खरातच्या मालमत्तेची ईडी चौकशी होणार – मुख्यमंत्री फडणवीस

दरम्यान, या प्रकरणी मारुती रभाजी वाळुंज (वय ५३, रा. पिंपळवंडी, ता. जुन्नर, जि. पुणे) चालक याला अटक (Arrested) करण्यात आली असून, गणेश सुमंता वाघोळे (रा. जुन्नर, जि. पुणे) हा वाहन मालक फरार आहे. सदर प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम १२३, २७४, २७५, २२३ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अरुण भिसे, विक्रांत मांगडे, प्रमोद मंडलिक, मिलिंद पाटील, हरिश्चंद्र पालवी, बजरंग कहाटे, बाळासाहेब पानसरे, मोठाभाऊ बच्छाव आदींच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली असून पुढील तपास सुरू आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : अपहरण करून ठार मारण्याचा प्रयत्न; चार संशयित गुंडाविरोधी पथकाच्या जाळ्यात

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत खंदेपालट

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत खंदेपालाट करण्यात आली आहे. बुधवारी (20 मे) बँकेच्या नूतन पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. यात चेअरमनपदी संगमनेरच्या संचालिका सरस्वती...