Thursday, May 21, 2026
Homeक्राईमNashik Crime News : अपहरण करून ठार मारण्याचा प्रयत्न; चार संशयित गुंडाविरोधी...

Nashik Crime News : अपहरण करून ठार मारण्याचा प्रयत्न; चार संशयित गुंडाविरोधी पथकाच्या जाळ्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

युवकाचे अपहरण (kidnapping) करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून फरार झालेल्या चार संशयितांना (Suspected) गुंडा विरोधी पथकाने शिताफीने अटक (Arrested) केली आहे. या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : सातपूरला ‘खरात फाईल्स’ची पुनरावृत्ती! लैंगिक शोषण प्रकरणी रवींद्र एरंडेला बेड्या

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, २७ मार्च रोजी रात्री फिर्यादी महेश तुकाराम गवळी (रा. नाशिकरोड) हे रेल्वे स्थानकाजवळील नॅशनल लॉजसमोर बसले असताना, पूर्वी पैशाच्या वादातून ओळख असलेले चार संशयित तेथे आले. त्यांनी गवळी यांना जबरदस्तीने कारमध्येबसवून नेले. यावेळी प्रथमेश सोनवणे याने त्यांच्या पोटात चाकू मारत जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर संशयितांनी गवळी यांना शांति पार्क उपनगरातील एका पडीत इमारतीत नेले.

हे देखील वाचा : Devendra Fadnavis : खरातच्या मालमत्तेची ईडी चौकशी होणार – मुख्यमंत्री फडणवीस

तेथे रवी शिंदे व नारायण नागापुरे यांनी लोखंडी कोयत्यांच्या उलट्या बाजूने त्यांच्या गुडघ्यावर मारहाण केली, तर प्रथमेश सोनवणे व अभय औटे यांनी लाकडी दांडक्यांनी पाठ, हात-पायांवर प्रहार केले. गंभीर जखमी झालेल्या गवळी यांना चौघांनी इमारतीवरून खाली फेकून दिले. यात त्यांच्या पाठीच्या मणक्याला फॅक्चर झाले असून ते गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संशयित फरार झाले होते. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातच्या घरात पोतेभर पैसा; मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमधून हवाला रॅकेट!

दरम्यान, गुंडा विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अक्षय गांगुर्डे व गणेश भागवत यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. रेल्वे स्थानक परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवाजी महाराज पुतळा, बिटको चौक, दत्त मंदिर चौक, सिटी सेंटर मॉल आदी ठिकाणांवरील फुटेज तपासून आरोपींचा माग काढण्यात आला. तपासात आरोपींनी वापरलेली एमएच-१२ ईटी ५६९० क्रमांकाची कार सातपूर परिसरात गेल्याचे निष्पन्न झाले.

हे देखील वाचा :  Ashok Kharat Case : खरात फाईल्स प्रकरणी एसआयटीचे ‘मौनव्रत’; तपासाच्या गोपनीयतेवर संशयाचे मळभ

त्यानुसार मोतीवाला कॉलेज परिसरात (Motiwala Collage Area) सापळा रचण्यात आला. तेथे नारायण संभाजी नागापुरे (वय ३२), प्रथमेश संतोष सोनवणे (२१), रवी अशोक शिंदे (२६) आणि अभय रामभाऊ औटे (२३) यांना ताब्यात घेण्यात आले. अटक केलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, सुनिल आडके, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले, दयानंद सोनवणे, सुनिता कवडे आदींनी सहभाग घेतला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा पोलीस दलातील पाच अधिकार्‍यांना पदोन्नती

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्य पोलीस दलातील पदोन्नतीची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली असून राज्यभरातील 77 सहायक पोलीस निरीक्षकांना (एपीआय) पोलीस निरीक्षक (पीआय) पदावर, तर 488 पोलीस...