नाशिक | Nashik
भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणाऱ्या अशोक खरातवर (Ashok Kharat) आतापर्यंत विविध प्रकरणात १२ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे त्याचा पाय आणखी खोलात गेला आहे. यानंतर आता खरातच्या मागे सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) चा ससेमिरा लागणार आहे. या वृत्ताला स्वत: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दुजोरा दिला आहे.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातच्या घरात पोतेभर पैसा; मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमधून हवाला रॅकेट!
गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमधील (Nashik) तपोवन येथे अखिल भारतीय संत समिती परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (रविवारी) नाशिकमध्ये आले असता त्यांनी माध्यमांशी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी त्यांनी खरातच्या मालमत्तेवर करण्यात येणाऱ्या कारवाईबाबत महत्वाची माहिती दिली.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : तगादा लावू नकोस, अन्यथा देवाचा कोप होईल; खरातने कांदा व्यापार्यालाही धमकावले
यावेळी ते म्हणाले की, “खरात प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. त्याच्या संपत्तीची आणि बँकेच्या व्यवहाराची सगळी माहिती एसआयटीकडे आहे. त्यानंतर आता ईडीकडून खरातच्या संपत्तीची चौकशी केली जाणार आहे. त्याने अनेक पतसंस्था आणि बँकांमध्ये आर्थिक व्यवहार केले आहेत. या पतसंस्था आणि बँकामधून त्याने करोडोंचे व्यवहार केले असून, हे सर्व व्यवहार संशयास्पद आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
हे देखील वाचा : Nashik Crime News : सातपूरला ‘खरात फाईल्स’ची पुनरावृत्ती! लैंगिक शोषण प्रकरणी रवींद्र एरंडेला बेड्या
सीडीआरची देखील चौकशी होणार
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशोक खरात प्रकरणी सीडीआर जाहीर करून त्याला कोणत्या नेत्याचे किती फोन आले याची माहिती दिली आहे. या सीडीआरमुळे मोठे नेते अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्याकडे हा सीडीआर कुठून आला असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले असून ते म्हणाले की, “सीडीआर प्राप्त करून घेण्याचा अधिकार कुणाला नाही. जे या प्रकरणाचा तपास करत आहेत अशा तपास यंत्रणांनाच तो सीडीआर मिळवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सीडीआर कसा बाहेर आला, तो कुठून मिळवला याची चौकशी केली जाईल. ज्यांचा खरात प्रकरणात सहभाग असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हे देखील वाचा : Nashik Crime News : न्यूड व्हिडीओ स्कँडलचा मास्टरमाईंड एरंडेला कोठडी
खरातची कुठली मालमत्ता ईडीच्या रडारवर
महिलांवरील अत्याचार प्रकरणात अशोक खरातला अटक केल्यानंतर त्याचे कोट्यवधींचे व्यवहार तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. यात नाशिक आणि शिर्डीतील मालमत्ता वा १३२ बँक खात्यांमधील कोट्यवधींच्या व्यवहारांचा समावेश आहे. अशोक खरात नॉमिनी असणाऱ्या जगदंबा पतसंस्थेत ३२ तर समता पतसंस्थेत १०० खाती सापडली आहेत. या १३२ खात्यांमधून कोट्यवधींचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे तपासात उघड झाले आहे.





