नाशिक | Nashik
शहरातील गंगापूर रोडवरील (Gangapur Road) रेवती ब्लू अपार्टमेंटमध्ये आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर (Dr. Manisha Jejurkar) (वय ४०) यांनी दि. ६ मार्च २०२६ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्यांची बहीण रोहिणी थोरात यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) गुन्हा दाखल झाला होता. घटनेनंतर या प्रकरणातील संशयित आणि मनीषा यांचे पती डॉ. नीलेश जेजुरकर यांनी विविध न्यायालयांत अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. मात्र नाशिक सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयानंतर अखेरीस १७ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयानेही त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. तसेच न्यायालयाने त्यांना आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते.
त्यानंतर नाशिक शहराच्या (Nashik City) गुन्हे शाखा युनिट एकने १ शुक्रवारी (दि. १८ सप्टेंबर) रोजी डॉ. नीलेश जेजुरकर (Dr. Nilesh Jejurkar) यांना बेड्या ठोकल्या होत्या. यानंतर त्यांना शनिवारी (दि. १९सप्टेंबर) रोजी नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने २२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, गुन्ह्याची व्याप्ती व गांभीर्य विचारात घेऊन या प्रकरणाचा तपास सरकारवाडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त प्रमोद वाघ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यानंतर आता या प्रकरणामध्ये एका महिलेलाही अटक करण्यात आली आहे. या अटकेमुळे डॉक्टर मनीषा जेजुरकर मृत्यू प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे.
हे देखील वाचा : Manisha Jejurkar Suicide Case : डाॅ. नीलेश जेजुरकरला चार दिवसांची पोलीस कोठडी; तपास सहाय्यक पाेलीस आयुक्तांकडे
डॉ. नीलेश जेजुरकर यांच्यासोबत नाशिक जिल्हा रुग्णालयात (Nashik Civil Hospital) काम करणाऱ्या डॉ. स्वाती चव्हाण (Dr. Swati Chavan) या महिलेला अटक करण्यात आली आहे. स्वाती आणि निलेश यांचे अनैतिक संबंध असल्याची चाहूल मनीषा जेजुरकर यांना लागली होती असा आरोप मनीषा यांच्या कुटुंबियांनी केला आहे. पोलीस चौकशीत डॉ. नीलेश जेजुरकर यांनी स्वाती यांच्या नावाचा उल्लेख केल्याने त्यांना या प्रकरणात अटक (Arrested) करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, डॉ. मनीषा जेजुरकर यांनी पतीच्या (Husbend) अनैतिक संबंधांमुळेच स्वत:ला संपवलं का? असा सवाल डॉ. स्वाती चव्हाण यांच्या अटकेमुळे उपस्थित केला जात आहे.या अटकेमुळे आत्महत्या प्रकरणाला (Suicide Case) वेगळे वळण मिळाले असून, हे आरोप सिद्ध होतात का? हे बघणे महत्त्वाचे असणर आहे.
हे देखील वाचा : Manisha Jejurkar Case : १९३ दिवसांचा बचावाचा खेळ थांबला; डॉ. मनीषा जेजुरकर आत्महत्येप्रकरणी पती डॉ. नीलेश जेजुरकर अटकेत
नेमकं प्रकरण काय?
फिर्यादीत नमूद असलेल्या माहितीनुसार, मनीषा यांचे पती डॉ. नीलेश हा २०२१ पासून एका त्रयस्थ डॉक्टर महिलेच्या सांगण्यावरून पत्नीकडे दुर्लक्ष करून त्यांचा सतत मानसिक छळ करत होता. जानेवारी २०२६ मध्ये डॉ. नीलेशच्या डॉक्टर मैत्रिणीने डॉ. मनीषा यांना फोन करून, तुझ्या नवऱ्याला तू आवडत नाहीस, तुझ्या बुद्धीची पातळी कमी आहे, अशा हीन शब्दांत मानसिक त्रास दिला होता. या कौटुंबिक कलहाला कंटाळून डॉ. मनीषा यांनी आयुष्य संपवल्याचा आरोप आहे. दरम्यान, घटनेच्या ठिकाणच्या छायाचित्रानुसार, खिडकीला दोरी बांधून आत्महत्या करणे भौतिकदृष्ट्या अशक्य वाटते. मृतदेहाचे (Dead Body) पोस्ट-मॉर्टम जिल्हा रुग्णालयातच झाले. मात्र नीलेश स्वतः याच रुग्णालयात (Hospital) कार्यरत होता. त्यामुळे पदाचा गैरवापर करून ‘पोस्ट-मॉर्टम’ अहवालात फेरफार करण्यात आला असून, ही आत्महत्या नसून हत्या असावी, असा संशय न्यायालयात व्यक्त करण्यात आला आहे.




