Friday, May 29, 2026
Homeक्राईमNashik Crime News : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; तोतया पोलीस अटकेत,...

Nashik Crime News : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; तोतया पोलीस अटकेत, अश्लील Video व्हायरल

वावी | वार्ताहर | Vavi

- Advertisement -

कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरण ताजे असतांनाच सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) नांदूरशिंगोटे येथील ३५ वर्षीय महिलेची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख करून घेत पोलीस असल्याचे भासवून एकाने फसवणूक, आर्थिक शोषण, ब्लॅकमेलिंग व अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित महिलेने वावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी (Police) संशयितास ताब्यात घेतले आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : भोंदू अशोक खरातला तिसर्‍या गुन्ह्यात ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी

पीडित महिलेची (Woman) दोन वर्षांपूर्वी इस्टाग्रामवर आशुतोष पाटील नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली. पुढे व्हॉट्सअॅप संवाद वाढत जाऊन दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण आरोपीने झाले. स्वतःचे खरे नाव आसीफ कौसर तडवी (रा. जळकी बाजार, ता. सिल्लोड, जि. संभाजीनगर) असल्याचे सांगितले. त्याने पीडितेच्या घरी येऊन तिच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली आणि लग्नाचे आमिष दाखवले. मात्र, त्याने आजपर्यंत लग्न न करता उलट पीडितेची फसवणूक (Fraud) केल्याचे महिलने तक्रारीत म्हटले आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : धक्कादायक! एका नामांकित कंपनीत तरूणींचे लैंगिक शोषण, मानसिक छळ; सहा जणांना अटक

२९ नोव्हेंबर २०२५ रोजी आरोपीने पीडित महिला एकटी असताना तिच्याकडे जबरदस्तीने शरीरसुखाची मागणी केली. विरोध केल्यावर त्याने तिला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर काही महिन्यांनी व्हॉट्सअॅप कॉलद्वारे धमकावत तिला अश्लील कृत्य करण्यास भाग पाडले. त्या घटनेचे त्याने मोबाईलवर रेकॉर्डिंग करून पुढे व्हायरल केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. आरोपीने संबंधित व्हिडिओ गावातील एका व्यक्तीला पाठवून तो व्हायरल केला. तसेच एआय तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट फोटो तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केल्याने पीडितेची समाजात बदनामी झाली.

हे देखील वाचा : Ashok Kharat Case : भोंदू खरात महिलांना जाळ्यात कसा ओढायचा? SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली धक्कादायक माहिती

आरोपीने आजारपण, अपघात (Accident) कर्ज व मोटारसायकल खरेदीच्या कारणाखाली गेल्या दोन वर्षांत पीडितेकडून जवळपास ३ लाख रुपये उकळल्याचेही समोर आले आहे.महिलेने ही रक्कम परत मागितल्यानंतर त्याने पैसे परत करण्यास नकार दिला. फेब्रुवारी २०२६ पासून आरोपी पीडितेला सतत धमक्या देत होता. फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर दबाव टाकला जात होता. तसेच तिच्या कुटुंबीयांनाही जीवे मारण्याची धमकी आरोपी देत असल्याचे महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. उपनिरीक्षक प्रमोद सरवर, हवालदार शहाजी शिंदे , किरण पवार पुढील तपास करत आहेत.

हे देखील वाचा : Nashik Crime News : कॉर्पोरेटच्या आड ‘जिहाद’; कंपनीत तरुणींचे शोषण आणि धर्मांतराचा कट

ऑफिसमध्ये येऊन पुन्हा गैरवर्तन

४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी आरोपी मोटारसायकलवर येऊन पीडितेच्या कार्यालयात घुसला. त्याने तिच्याशी गैरवर्तन, छेडछाड केली व धमकावले. त्यानंतर तो बाहेर थांबला असताना पीडितेने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीकडून पोलिसांचे बनावट आयडी कार्ड, टोपी, कपडे, शूज व त्याची दुचाकी जप्त केली आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : खरातच्या जाळ्यात मुंबईचे उद्योजक; कोट्यवधींच्या मनी लाँड्रिंगचा शिर्डीतून पर्दाफाश, तेरावा गुन्हा नोंद

ताज्या बातम्या

बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी

0
ओझे | वार्ताहर Oze लखमापूर परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दहेगाव येथील एका दुचाकीस्वारावर बिबट्याने अचानक हल्ला करत जखमी...