Monday, June 15, 2026
Homeक्राईमदोन महिने पोलिसांना चकवा…अखेर ‘गोल्ड मॅन’ लूट प्रकरणातील मुख्य आरोपी जेरबंद

दोन महिने पोलिसांना चकवा…अखेर ‘गोल्ड मॅन’ लूट प्रकरणातील मुख्य आरोपी जेरबंद

14.30 लाखांचे 105 ग्रॅम सोनं जप्त; सातपूर पोलीस व गुन्हे शाखेची थरारक कामगिरी

सातपूर | प्रतिनिधी
नाशिकच्या सातपूर परिसरात घडलेल्या आणि शहरभर चर्चेचा विषय ठरलेल्या ‘गोल्ड मॅन’ मकरंद साळी लूट प्रकरणाचा अखेर पर्दाफाश झाला आहे. तब्बल दोन महिने पोलिसांना चकवा देत राज्यात ठिकाणे बदलणाऱ्या मुख्य आरोपीला सातपूर पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून विक्री केलेले १४ लाख ३० हजार रुपये किमतीचे १०५ ग्रॅम सोनंही हस्तगत करण्यात आले आहे.

२३ मार्च २०२६ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास सातपूर परिसरात भररस्त्यात व्यावसायिक मकरंद साळी यांना अडवून आरोपींनी त्यांना मारहाण केली होती. तसेच धारदार शस्त्राचा धाक दाखवत गळ्यातील सोन्याच्या चेन लुटून आरोपी फरार झाले होते. या धाडसी घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. गुन्ह्यानंतर आरोपींनी आपले ठिकाण सतत बदलत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

जळगाव, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, पुणे आदी जिल्ह्यांमध्ये त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली. प्रत्येक वेळी संशयित आरोपी पोलिसांच्या जाळ्यातून निसटत होता. मात्र तपास पथकाने चिकाटी सोडली नाही.

Monsoon Update: मान्सूनची जोरदार आगेकुच; गोव्याच्या वेशीवर पोहोचला, महाराष्ट्रात कधी?हवामान खात्याचा ताजा अंदाज

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे तसेच गुन्हे शाखा युनिट-२ चे पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली तपासाला वेग देण्यात आला.

तांत्रिक विश्लेषण, सीडीआर तपास, गुप्त बातमीदारांचे जाळे आणि अचूक नियोजनाच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपी संभाजी विलास कवळे याचा ठावठिकाणा शोधून काढला. पंचवटी परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर संपूर्ण कट उघडकीस आला. यापुढे तपासाची साखळी जोडत पोलिसांनी जळगाव येथे धाड टाकून आरोपीने विक्री केलेले १०५ ग्रॅम वजनाचे सोनं जप्त केले. त्यामुळे आरोपीला अटक करण्याबरोबरच लुटलेला मुद्देमाल परत मिळवण्यातही पोलिसांना यश आले.

या कारवाईत सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ बटुळे, पोलीस अंमलदार रवींद्र जाधव तसेच गुन्हे शाखा युनिट-२ चे पोलीस हवालदार नंदकुमार नांदूर्डीकर आणि पोलीस अंमलदार महेश खांडबहाले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

ताज्या बातम्या

घारगावमध्ये पोलिसांचा छापा; ७० लिटर ताडी दारूसह महिला जेरबंद

0
घारगाव । प्रतिनिधी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील एका 'फिटनेस जिम'च्या पाठीमागे बेकायदेशीररित्या ताडी दारू विकणाऱ्या एका महिलेवर घारगाव पोलिसांनी गुरुवारी दुपारी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी...