Monday, August 3, 2026
Homeक्राईमAshok Kharat Case : खरातवर १७ गुन्हे अन् PMLA ची कारवाई; 'मनी...

Ashok Kharat Case : खरातवर १७ गुन्हे अन् PMLA ची कारवाई; ‘मनी ट्रेल’ची सुनावणी सुरु

जोरदार युक्तिवाद होण्याची शक्यता

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दैवी शक्ती अन् भविष्याची भीती दाखवून महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या भोंदू ‘कॅप्टन’ अशोक खरातच्या (Ashok Kharat) ४२ कोटी ८८ लाखांच्या ‘मनी ट्रेल’ प्रकरणात ‘ईडी’ने मुंबईच्या विशेष न्यायालयात (ED Court) तब्बल ३ हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. या बेनामी आर्थिक सम्राज्याचा फास घट्ट झाला असून, खरातची पत्नी कल्पना हिच्यासह सहा जणांवर खटला सुरू झाला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी १४ ऑगस्ट रोजी होणार असून यात जोरदार युक्तिवाद होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

‘कॅप्टन’ खरातने नाशिक, सिन्नर, शिर्डी आणि राहाता भागात अंधश्रद्धेचे जाळे पसरवून नागरिकांना लुटले. या लुटालुटीतून जमा झालेला कोट्यवधींचा निधी त्याने कसा जिरवला, याचा खुलासा ‘ईडी’च्या तपासातून झाला आहे. यात त्याची पत्नी कल्पना खरात हिच्यासह संशयित अरविंद पांडुरंग बावके, नामकर्ण यशवंत आवारे, अनिवाश वामन कांडेकर आणि मिलिंद दादासाहेब बनकर या हस्तकांचा थेट सहभाग सम ोर आला आहे. खरातने गोळा केलेल्या पैशांची विल्हेवाट लावण्यासाठी स्थावर मालमत्ता खरेदी करणे, रोख कर्जे वाटणे आणि आपल्या विश्वासातील लोकांना (People) पैसे देऊन ‘मनी लाँड्रिंग’ करणे असा सिंडिकेट चालवला, असे सीबीआयने म्हटले आहे.

हे देखील वाचा : Shalarth ID Scam : संजय गरूड न्यायालयीन कोठडीत; आठ मुख्याध्यापकांची चौकशी

ईडी’ने या प्रकरणात (ED Case) तब्बल ३० प्रमुख साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. खरातच्या आर्थिक व्यवहारांवर थेट आणि पूर्ण नियंत्रण असल्याचे पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले आहेत. संशयितांच्या वतीने अॅड. निरंजन मुंदडगी (खराततर्फे), अॅड. उज्ज्वलकुमार चव्हाण व अॅड. भूषण यादव (बनकरतर्फे), तसेच अॅड. राहुल कासलीवाल, मिहीर कासलीवाल व महेश पवार यांनी न्यायालयात वकिलपत्रे दाखल केली आहेत. गैरहजर संशयितांना हजेरीतून सूट देण्याची विनंती न्यायालयाने मान्य केली.

पत्नी अन् साथीदार प्रत्यक्ष हजर

शनिवारी (दि. १) मुंबईतील विशेष न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान कल्पना खरात हजर होत्या. तर,मुख्य संशयित अशोक खरात सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता पोलिसांच्या कोठडीत असल्याने त्याला प्रत्यक्ष आणता आले नाही. मात्र, त्याची पत्नी कल्पना खरात आणि साथीदार मिलिंद बनकर न्यायालयात प्रत्यक्ष हजर होते. ‘ईडी’तर्फे विशेष सरकारी वकील अरविंद आघव आणि ऋषभशुक्ला यांनी सर्व संशयितांना नोटीस बजावल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले.

१७ गुन्हे अन् ‘पीएम एलए’ची कारवाई

अशोक खरातवर नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात (Sarkarwada Police Station) २५ मार्च रोजी खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यापाठोपाठ ६ एप्रिल रोजी ‘ईडी’ने पीएमएलए (मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा २००२) अंतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल केला. सध्या खरातवर नाशिक, सिन्नर, शिर्डी आणि राहाता येथे एकूण १७ गंभीर गुन्हे नोंद आहेत.

ताज्या बातम्या

Shani Shingnapur : शनैश्वर देवस्थानच्या आर्थिक व्यवहारांची फॉरेन्सिक चौकशी सुरु

0
शनिशिंगणापूर |वार्ताहर| Shani Shingnapur श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथील 1 जानेवारी 2020 ते 2025 या कालावधीतील आर्थिक व्यवहारांचे फॉरेनसिक लेखापरीक्षण केले जाणार असल्याची माहिती देवस्थानचे कार्यकारी अधिकारी...