नाशिक | प्रतिनिधी | Nashik
अंबड व गंगापूर पोलीस ठाणे (Ambad and Gangapur Police Station) हद्दीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या परदेशी टोळीतील सराईत गुन्हेगारास गुंडा विरोधी पथकाने सापळा रचून तवली फाटा, पेठरोड येथून ताब्यात घेतले. अंबड व गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या परदेशी टोळीतील सराईत गुन्हेगारास गुंडा विरोधी पथकाने केले जेरबंद (दि. २७ जानेवारी २०२६) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास फिर्यादी विनोद महादु शेवाळे (रा. कामठवाडा नाशिक यांच्या घराबाहेर कुंदन परदेशी व कुणाल एखंडे तसेच त्यांचे २० ते २५ साथीदार यांनी त्यांचा मुलगा प्रणव याच्या नावाने शिवीगाळ करुन दोन चारचाकी वाहनांची तोडफोड करून (एम. एच. १५ जे.सी.०००२) पिकअपमधुन पळून गेले म्हणुन अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : भोंदू अशोक खरातला ‘इतक्या’ दिवसांची न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा कोर्टात हजर करणार
त्यानंतर सर्व संशयितांनी अंबड (Ambad) येथुन निघुन कॉलेजरोड येथे शेतकरी नावाच्या चहाच्या दुकानात गेले. यावेळी फिर्यादी रितेश भाऊसाहेब चोरघे हे त्यांचे चहाचे दुकान बंद करत असतांना त्यातील दोन टवाळखोरांनी त्यांच्या कडुन सिगारेट मागितली असता त्यांनी सिगारेट नसल्याचे सांगितल्याने त्यांचे इतर पाच ते सहा साथिदारांनी पिकअप मधुन उतरुन त्यांनी चोरघे यांच्याशी वाद घालुन त्यांना धक्काबुक्की करुन त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना कुन्हाडीने गंभीर जखमी करुन त्यांच्या खिशातील दहा ते बारा हजार रुपये बळजबरीने हिसकावून घेतले. तर खुर्चांची तोडफोड करुन कामगारांना लाथाबुक्यांनी व काठ्यांनी मारहाण करुन पळुन गेले म्हणुन गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हे देखील वाचा : दुर्दैवी : विहिरीत पडलेल्या आईला वाचवण्यासाठी मुलाची उडी, दोघांचाही मृत्यू
या गुन्ह्यांचा समांतर तपास करत असतांना गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेश राठोड व कल्पेश जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गुन्हयातील संशयित हा तवली फाटा, पेठ रोड परिसरात आहे. त्यांनी ही माहिती तात्काळ वरिष्ठांना देऊन त्यांच्या आदेशाने गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी उपनिरीक्षक संदिप पवार, अंमलदार विजय सुर्यवंशी, प्रदिप ठाकरे, सुनिल आडके, राजेश राठोड, कल्पेश जाधव, अक्षय गांगुर्डे, घनश्याम महाले, गणेश भागवत, दयानंद सोनवणे, सुनिता कवडे यांच्या पथकाने तवली फाटा पेठरोड येथे सापळा रचून जय उर्फ चिक्या मंगेश भुजबळ (२५, रा. रामशेज, आशावाडी, ता. दिंडोरी, जि. नाशिक) याला ताब्यात घेतले. त्याला पुढील तपास कामी गंगापूर पोलीसांच्या (Gangapur Police) ताब्यात दिले.
हे देखील वाचा : Nashik Crime News : पार्किंगचा वाद विकोपाला; धारदार शस्त्राने वार करुन तरुणाचा खून




