नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
नाशिक-पुणे मार्गावरील (Nashik-Pune Highway) पानटपरी चालकाला ठार (Killed) मारण्याच्या प्रयत्न करणा-या टोळीतील एका फरारीला उपनगर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने अटक (Arrested) केली. २४ सप्टेंबरला हर्षल राजेंद्र देवरे याच्या पानटपरीवर संशयित लखन काशिद व क्रिश शिंदे आले. त्यांनी सिगारेट घेतली. देवरेने त्याचे पैसे मागितल्याचा राग आल्याने काशिदने अन्य सात-आठ साथीदारांना बोलावले.
हे देखील वाचा : Nashik News : सिंहस्थाच्या तयारीला वेग
आम्ही जुन्या नाशिकचे (Nashik) भाई आहोत, आमच्याकडे कोणताच दुकानदार पैसे मागत नाही, तू कसा काय पैसे मागतो, तुझा काटाच काढतो असे म्हणून या टोळक्याने देवरेला मारहाण करून शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले होते. गर्दी जमल्याने हल्लेखोर पळून गेले. गुंडा विरोधी पथकाचे पोलिस गणेश भागवत यांना या गुन्ह्यातील संशयित ओम खंडू चौधरी (१९, रा. कथडा, जुने नाशिक) हा नाशिकमध्ये असल्याची माहिती मिळाली.
हे देखील वाचा : श्रीलंकेत कांदा निर्यात वाढणार; कांदा आयात शुल्कात २० टक्के कपात
दरम्यान, पथकाचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, उपनिरीक्षक मलंग गुंजाळ, विजय सुर्यवंशी, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, राजेश राठोड, अशोक आघाव, सविता कवडे यांनी भद्रकालीत सापळ रचून चौधरीला अटक केली. त्याला उपनगर पोलिसांच्या (Police) ताब्यात दिले.