नाशिक | Nashik
शहरातील वाढत्या गुन्हेगारीला (Criminal) आळा घालण्यासाठी नाशिक पोलिसांनी (Nashik Police) भाऊ, दादा, मामा, आण्णा यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.पोलिसांच्या (Police) या कारवाईचे नाशिककरांकडून कौतुक करण्यात येत आहे. मात्र, अशातच गोदाघाटावर दोघांनी एका युवकावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोदाघाट परिसरातील (Godaghat Area) दुतोंडी हनुमानाजवळील ‘अमृततुल्य’ चहाच्या शटरजवळ वैभव अश्रुबा नरवाडे हा युवक झोपलेला होता. यावेळी आज (रविवारी) पहाटे दोघांनी त्याच्यावर कोयत्याने वार (Koyata Attack) केले. हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांनी नरवाडे याचा हल्ल्यात मृत्यू झाला असावा असे समजून पळून गेले.
हे देखील वाचा : Nashik Crime : मामा राजवाडेच्या अडचणीत वाढ; आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल
दरम्यान, एवढा गंभीर हल्ला (Attack) होऊनही वैभव नरवाडेचे प्राण वाचले असून, त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान घटनेनंतर पोलिसांनी हल्लेखोरांचा तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे नाशिकमधील (Nashik) कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.




