Tuesday, October 15, 2024
Homeक्राईमNashik Yeola Crime : ८ लाख ३५ हजारांच्या सोन्यासह मोटारसायकल जप्त; येवला...

Nashik Yeola Crime : ८ लाख ३५ हजारांच्या सोन्यासह मोटारसायकल जप्त; येवला तालुका पोलिसांची कामगिरी

येवला | प्रतिनिधी | Yeola

येवला तालुका पोलिसांनी (Yeola Taluka Police) गुन्हेगारांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली असून चैन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरजिल्हा सराईत गुन्हेगारांना अटक (Arrested) केली आहे. येवला, लासलगाव, नांदगाव,वैजापुर परिसरात जबरी चोरी चैन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरजिल्ह्यातील सराईत आरोपीकडून (Accused) ८ लाख ३५ रुपये किंमतीचे १०५ ग्रॅम वजनाचे सोन्याच्या दागिने व एक मोटारसायकलसह संजय रमेश बाबरे (२९) लोणी ता.राहता व राहुल रमेश मावस (२५) नादी ता. वैजापूर या दोन आरोपींना अटक केली आहे, अशी माहिती येवला तालुका पोलिसांनी दिली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : ऑफिस बॉयनेच दिली मालकाची सुपारी; दरोड्यासाठी केली रेकी

सोनाली गोकुळ शेळके यांनी येवला तालुका पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून तपास सुरू असताना हे आरोपी पोलिसांच्या (Police) हाती लागले आहेत. नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती, मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या आदेशानुसार येवला तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलीक यांच्या मार्गदर्शनाखाली येवला तालुका पोलीस स्टेशनचे पो.उप निरी. हर्षवर्धन बहीर, पो.ना. सचिन वैरागर, पंकज शिंदे, नितीन पानसरे,सागर बनकर यांचे पथक तपास करत होते.

हे देखील वाचा : Nashik News : जुने सीबीएस कात टाकणार; दहा कोटीत होणार पुनर्बांधणी

यावेळी चोरी झालेल्या मोटारसायकल (Motorcycle) चोरीतील आरोपी संजय रमेश बाबरे, राहुल रमेश मावस यांनी जबरी चोरीचे गुन्हे केल्याची माहिती तपास पथकास मिळाली होती. त्यानंतर या चोरट्यांना ताब्यात घेऊन अधिक विचारणा केली असता त्यांनी येवला तालुका, लासलगाव, नांदगाव व वैजापुर पोलीस स्टेशन महिलांच्या (Women) गळ्यातील दागीने चोरी केल्याची कबुली दिली. यानंतर त्यांच्याकडून स्नॅचिंगचे ०५ गुन्हे व ०१ मोटार सायकल चोरीचा गुन्हे उघडकीस आणण्यात येवला तालुका पोलिसांना यश आले आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : तरुणावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला

दरम्यान, त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून ४ तोळे वजनाची २ लाख ८० हजार रुपयांची पोत,१ तोळे वजनाची ७० हजार रुपयांची पोत,१ तोळे वजनाची ७० हजार रुपयांची पोत,तीन तोळे वजनाचा २ लाख १० हजार रुपये किंमतीचा पोहेहार,दीड तोळा वजनाची १ लाख ५ हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी व १ लाख किमतीची काळ्या रंगाची बजाज पल्सर असा एकूण ८ लाख ३५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या