Friday, September 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik NMC News : विशेष महासभेत सहा मृतांच्या कुटुंबीयांना धनादेशांचे वितरण

Nashik NMC News : विशेष महासभेत सहा मृतांच्या कुटुंबीयांना धनादेशांचे वितरण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहर व परिसरातील खड्ड्यांमुळे (Nashik Potholes) झालेल्या अपघातांत (Accident) मृत्यू पावलेल्या सहा नागरिकांच्या वारसांना नाशिक महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येकी पाच लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्यात आली. शनिवारी झालेल्या विशेष महासभेत महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, आयुक्त मनीषा खत्री, गटनेते, पदाधिकारी आणि संबंधित प्रभागातील नगरसेवकांच्या उपस्थितीत वारसांना धनादेश वितरित करण्यात आले.

- Advertisement -

खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत (Potholes Accident) जितेंद्रसिंग मंगलसिंग गिरासे, प्रभाकर साहेबराव निकम, उज्वला शांताराम गायकवाड, दिपाली दिलीप बेळे, निलेश प्रल्हाद कोतकर आणि मासुम भिकन शाह यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांना (Family) प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत (Help) देण्यात आली.

हे देखील वाचा : Nashik NMC News : विशेष महासभेची खड्ड्यांच्या प्रश्नावरून वादळी सुरुवात; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचेही आक्रमक आंदोलन

दरम्यान, विशेष महासभेच्या सुरुवातीलाच खड्ड्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी आक्रमक आंदोलन (Protest) केले. शहरातील खड्ड्यांमुळे नागरिकांचे बळी जात असताना केवळ आर्थिक मदत देऊन प्रश्न सुटणार नाही, तर या मृत्यूंना जबाबदार असलेल्या अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे मृतांच्या वारसांना मदतीसोबतच दोषींवर कारवाईचा मुद्दाही महासभेत (Mahasabha) केंद्रस्थानी राहिला.

ताज्या बातम्या

संपादकीय : ११ सप्टेंबर २०२६ – विद्यार्थ्यांचा आक्रोश कोणी ऐकेल काय?

0
महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुणे शहरासह संपूर्ण राज्यामध्ये आज स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीमुळे एक अभूतपूर्व आणि चिंताजनक जनक्षोभ उसळला आहे. नीट परीक्षेपासून सुरू...